सांगली जिल्ह्यात द्राक्षे खरेदीवरुन दोन गटात हाणामारी; चाकू हल्ल्यात दोघे गंभीर;मिरज पोलिसात गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यात द्राक्षे खरेदीवरुन दोन गटात हाणामारी; चाकू हल्ल्यात दोघे गंभीर;मिरज पोलिसात गुन्हा दाखल
Miraj Erndoli Crime
Image Credit source: TV9

सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील एरंडोलीत द्राक्ष खरेदीवरुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका गटाने चाकू हल्ला केल्याने दोघे जण गंभीर जखमी झाली आहेत. याप्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर देवकुळे

| Edited By: महादेव कांबळे

Mar 31, 2022 | 4:43 PM

सांगलीः सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यात (Miraj Taluka)एरंडोली येथे द्राक्षे घेऊन (Grapes) त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून दोन गटात तुफान हाणामारी (Group Beating) झाली. या हाणामारीत चाकुनी वार केला गेल्याने दोघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रदीप रामचंद्र सूर्यवंशी आणि शरद शिवाजी पाटील यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. या हाणामारीची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे. पैशा देवाण घेवाणीच्या कारणावरुन झालेल्या हा वाद विकोपाला जाऊन त्यातून जोरदार हाणामारीची घटना घडली आहे. त्यामुळे परस्परविरोधी पोलीस तक्रार दाखल झाली आहे.

प्रदीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पाटील यांनी वडील रामचंद्र सूर्यवंशी यांच्याकडून पाहुण्यांना देण्यासाठी दोन कॅरेट द्राक्षे घेऊन गेले होते. त्यानंतर जेव्हा प्रदीप हे घरी आले त्यावेळी त्यांना शरद पाटील पैसे न घेताच द्राक्षे घेऊन गेल्याचे समजले. त्यावेळी शरद यांनी तुमचे द्राक्षेही देत नाही, आणि पैसेही देत नसल्याचे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरु झाल्यानंतर त्यांनी त्यांनी पैशाचा विषय निघाला तेव्हा त्यांनी, द्राक्षे पाहिजे असल्यास सोमवारी रात्री 9 वाजता महेश शिंदे याच्या बेदाणा शेडवर या म्हणून सांगितले. त्यांनी पैसे देतो म्हणून सांगितल्यावर शरद आणि भरत हे पैसे घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

आणायले गेले पैसे आणि झाला हल्ला

शरद पाटील यांनी पैसे पाहिजे असल्यास बेदाणा शेडवर या म्हणून सांगितले होते. द्राक्षेचे पैसे आणण्यासाठी म्हणून ते शरद आणि भरत पैसे आणण्यासाठी ते तिकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत.

पैशाच्या वादावरुन चाकू हल्ला

शरद यांनी सांगितले प्रदीप सूर्यवंशी यांच्यासोबत द्राक्षे देण्याचे ठरले होते. तसेच शरद पाटील हे काशिनाथ शिंदे यांच्या शेडवर द्राक्षे आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रदीप आणि तुकाराम हे दोघे त्या ठिकाणी गेले. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रदीपने चाकू घेऊन शरद याच्या अंगावर धावून गेला त्यावेली त्यांचा भाऊ भरत मध्ये आला. त्यावेळी त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. चाकू हल्लात त्याला जखम झाली असून याप्रकरणी दोघांनी परस्परविरोधी पोलीस तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

Video Gadchiroli accident | गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विद्यार्थी गंभीर जखमी

सोलापुरात दरोड्यासह सहा घरफोड्या करणारा दरोडेखोर अटकेत; ग्रामीण गुन्हे शाखेकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune crime | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत वाढ ; अत्याचारग्रस्त तरुणींने केली डीएनए टेस्टची मागणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें