स्वत:चा मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार? : संजय काकडे

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Sanjay Kakde attack on Pankaja Munde) यांच्यावर हल्लाबोल केला.

स्वत:चा मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार? : संजय काकडे

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Sanjay Kakde attack on Pankaja Munde) यांच्यावर हल्लाबोल केला. ज्यांना मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार, असा घणाघाती सवाल संजय काकडे (Sanjay Kakde attack on Pankaja Munde) यांनी विचारला.

पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केलं ते भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याला दुखावणारे आहे.  त्यांनी जे वक्तव्य केलं, ते कृतीत आणलं नाही, असं संजय काकडे म्हणाले.

पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही काम करता आलं नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार? असा सवाल संजय काकडे यांनी विचारला. ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्यांनी मी पक्ष वाढवेल, मी हे करेल मी ते करेल असं बोलू नये, असा सल्लाही काकडेंनी दिला.

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी राज्यसभेवर निवडून आलो. ते पाच वर्षे सगळ्यांना सांभाळायचे. पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात इतर समाजातील लोकांना त्रास दिला. जातीपातीचे राजकारण केल्याने पंकजा यांचा पराभव झाला. स्वतःचा पराभव दुसऱ्याच्या माथी मारण्याचा हा प्रकार आहे. पक्षावर दबाब टाकून स्वतःच्या पदरात काही तरी मिळवण्याचा पंकजा यांची नेहमीची सवय आहे, असा हल्लाबोल संजय काकडे यांनी केला.

पंकजा मुंडे यांची मशालयात्रा

पंकजा मुंडे यांनी काल गोपीनाथ गडावर बहुप्रतीक्षीत मेळावा घेतला. त्यावेळी पंकजांसह एकनाथ खडसे यांनी मनातील खदखद जाहीर व्यक्त केली. पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल करताना पंकजा मुंडे यांनी कोअर कमिटीचं पद सोडलं. इतकंच नाही तर हा पक्ष माझ्या बापाचा आहे, त्यामुळे मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर तो त्यांचा निर्णय असेल असं पंकजा म्हणाल्या. शिवाय राज्यात लवकरच मशाल यात्रा काढणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *