Pooja Chavan suicide case | एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही, संजय राठोडांनी राजीनामा दिलेला नाही : हसन मुश्रीफ

चौकशी झाल्याशिवाय आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही," अशी प्रतिक्रिया ग्राविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. (Sanjay Rathore Hasan Mushrif)

Pooja Chavan suicide case | एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही, संजय राठोडांनी राजीनामा दिलेला नाही : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 7:17 PM

अहमदनगर :वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)यांनी राजीनामा दिलेला नाही. यांच्या समर्थनार्थ दिग्रस मतदारसंघात मोर्चादेखील निघालेला आहे. त्यामुळे चौकशी झाल्याशिवाय आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही,” अशी प्रतिक्रिया ग्राविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी वरील वक्तव्य केले. ते अहमदनगरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. (Sanjay Rathore has not given resign said Hasan Mushrif)

“वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. यांच्या समर्थनार्थ दिग्रस मतदारसंघात मोर्चादेखील निघालेला आहे. त्यामुळे चौकशी झाल्याशिवाय आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवणं बरं नाही. भाजपची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही घडलं की महाविकास आघाडी बदनाम कशी होईल, यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.

ईडीचा वापर करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीबद्दल प्रतिक्रिया दिली. भाजपकडून विरोधी पक्षीय नेत्यांच्या मागे ED लावून त्यांना अडचणीत आणण्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी केला आहे. यावर बोलताना “ED आणि CBI यांना चौकशी करण्याच्या अधिकारासंबंधी कायदा करू,” असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपला असल्याचे सांगितले जात आहे. या बाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरल्यानंतर याबाबत बोलताना ती माहिती खोटी असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊ त्यांनी सांगितले.

इतर बातम्या :

Video | भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी-संजय राठोड समर्थक राजूदास जाधव यांच्यात शाब्दिक खडाजंगी, पाहा व्हिडीओ

या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय काय? – नारायण राणे

धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोन्ही प्रकरणं वेगवेगळी, उगाच गल्लत करु नका: संजय राऊत

(Sanjay Rathore has not given resign said Hasan Mushrif)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.