संजय राऊत यांची आरोग्य तपासणी, मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी झाली. (Sanjay Raut Lilavati hospital)

संजय राऊत यांची आरोग्य तपासणी, मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 7:40 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची शनिवारी ( 28 नोव्हेंबर) लीलावती रुग्णालयात (Lilavati hospital) आरोग्य तपासणी झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी राऊत येत्या मंगळवारी (1 डिसेंबर) लीलावती रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठीच ते दुपारी लीलावती रुग्णालायात आल्याचे सांगण्यात येत आहे.(Sanjay Raut visited Lilavati hospital for health checkup)

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत शनिवारी (28 नोव्हेंबर 2020) लीलावती रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांची प्रथमिक तपासणी झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी सर्जरी झाली होती. याच सर्जरीशी निगडीत शनिवारी (28 नोव्हेंबर 2020) त्यांच्या पुढील तपासण्या करण्यात आल्या. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राऊत पुन्हा मंगळवारी रुग्णालयात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांच्यावर पुढील उपचार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. सरकार स्थापन करण्यासाठी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीस संजय राऊतदेखील उपस्थित होते. यावेळी राऊत यांना अस्वस्थ वाटत होते. या बैठकीनंतर शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटर तर उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले होते. मात्र, संजय राऊत थेट लीलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर राऊत यांच्यावर नोव्हेंबर महिन्यात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. राऊत लीलावती रुग्णालयातील (Lilavati hospital) 11 व्या मजल्यावर विशेष कक्षात होते. त्यांनतर राऊत येणाऱ्या मंगळवारी (1 डिसेंबर) पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल होणार असल्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्यावर पुढील उपचार होतील असे सांगण्यात येत आहे. (Sanjay Raut visited Lilavati hospital for health checkup)

संबंधित बातमी :

संजय राऊत अचानक लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार

देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : संजय राऊत

Bharat Bhalke Funeral live : भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुलाकडून भडाग्नी

(Sanjay Raut visited Lilavati hospital for health checkup)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.