माजी नगरसेवकाने मागितली 20 लाखांची खंडणी; न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी

माजी नगरसेवक संजय तेलनाडेच्या एस.टी. सरकार गँगवार पोलिसांनी दोनदा मोक्कांतर्गत कारवाईनंतर तेलनाडे बंधू फरारी होते. त्यापैकी संजय याला गावभाग पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. खंडणी प्रकरणी त्याच्यावर कारवाई केली गेली आहे.

माजी नगरसेवकाने मागितली 20 लाखांची खंडणी; न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी
संजय तेलनाडेला खंडणीप्रकरणी पोलीस कोठडीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 4:06 PM

इचलकरंजीः वृद्धेचे घर बळकावण्यासह 20 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई (Mocca action) करण्यात आलेल्या एस.टी.सरकारचा (S.T.Sarkar) म्होरक्या माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे  (Sanjay Shankarao Telnade)याला बुधवारी गावभाग पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील संजयचा भाऊ सुनील हा फरारी आहे. त्याच्या शोधासाठी आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

माजी नगरसेवक संजय तेलनाडेच्या एस.टी. सरकार गँगवार पोलिसांनी दोनदा मोक्कांतर्गत कारवाईनंतर तेलनाडे बंधू फरारी होते. त्यापैकी संजय याला गावभाग पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती.

तेलनाडेसह पाच जणांवर गुन्हा

सध्या तो कारागृहात आहे. 5 मार्च २०२० ला गावभाग पोलRस ठाण्यात पतीच्या संशयास्पद मृत्यूची भीती दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन वृद्धेचे घर बळकावण्यासह वीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गावभाग पोलिसात तेलनाडे बंधूसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारागृहात असलेल्या संजय याला न्यायालयाच्या परवानगीने गावभाग पोलिसांनी ताबा घेतले आहे.

सुनील तेलनाडे फरारी

संजय तेलनाडेला न्यायालयात हजर केले असता 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणखीन तीन संशयितांना यापूर्वीच अटक केली असून, सुनील तेलनाडे हा फरारी आहे. याची माहिती गावभागचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी दिली. या आधीही संजय तेलनाडेवर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असून तो कायम आपली दहशत माजवण्यासाठी प्रयत्न करत होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.