कराडमधील परिस्थिती गंभीर, जीवनावश्यक वस्तूंसाठी संघर्ष, बँका, पेट्रोल पंप बंद : पृथ्वीराज चव्हाण

सातारा जिल्ह्यातील कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे (Satara Corona Update). कराडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे.

कराडमधील परिस्थिती गंभीर, जीवनावश्यक वस्तूंसाठी संघर्ष, बँका, पेट्रोल पंप बंद : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 5:20 PM

सातारा : “सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याची परिस्थती गंभीर आहे (Satara Corona Update). या भागातील कोरोनाबाधितांचा आकडा 71 वर पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका कंटनेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कराडमध्ये दूध, औषधं आणि किराणा सामान या जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी संघर्ष सुरु आहे. याशिवाय बँका आणि पेट्रोल पंपही बंद करण्यात आले आहेत”, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरवर सांगितलं (Satara Corona Update).

सातारा जिल्ह्यातील कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. कराडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. कराड तालुक्यात आज सकाळपासून तब्बल 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कराडच्या या परिस्थितीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली आहे.

“कराड तालुक्यात आतापर्यंत 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण कराड तालुका, मलकापूर नगरपालिका आणि त्यालगतच्या 13 गावांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या भागांमध्ये दूध, औषधं आणि किराणा सामान या जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी संघर्ष सुरु आहे. याशिवाय बँका आणि पेट्रोल पंपही बंद करण्यात आले आहेत”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील सैदापूरचे फार्मसी कॉलेज, विजयनगरचे कृषी कॉलेज आणि पार्ले येथील तीन वसतिगृहातील कोरोना विलगीकरण कक्षांना भेट दिली. या कक्षांमधील 200 पेक्षा जास्त संशयित रुग्णांशी संवाद साधल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. सर्व रुग्णांची जेवणाची आणि स्वच्छतेची चौकशी केल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्यासोबत प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकारीदेखील होते, असंही त्यांनी सांगितलं.

साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 113 वर पोहोचला आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे कराड तालुक्यात आहेत. साताऱ्यात आज 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी कराड तालुक्यातीलच 14 नवे रुग्ण आहेत.

संबंधित बातमी :

अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला

…म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर

लॉकडाऊनदरम्यान Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.