एक किडनी बहिणीला दान, एका किडनीवर हॉटस्पॉटमध्ये रुग्णसेवा, देवदूत डॉ. जयश्री देसाईंना सलाम

प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. यांच्यापैकी एक आहेत कराड मलकापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या महिला डॉक्टर जयश्री देसाई. (Satara Karad Doctor Jayashree Desai )

एक किडनी बहिणीला दान, एका किडनीवर हॉटस्पॉटमध्ये रुग्णसेवा, देवदूत डॉ. जयश्री देसाईंना सलाम
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 1:02 PM

कराड : किडनी दान केल्यामुळे शारीरिक प्रकृती नाजूक. तरीही रुग्णांची सेवा करता यावी, म्हणून कोरोनाच्या पहिल्या लाटेत ठरवून वैद्यकीय नोकरी स्वीकारली. पती-पत्नी दोघेही डॉक्टर आणि घरात चौथं कोणी नसल्यामुळे सात वर्षांच्या लहान मुलीला एकटीला घरात कुलूपबंद ठेवण्याची वेळ आली. वर्षभरात 1790 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या हॉटस्पॉटमध्ये काम केलं. कराड मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर जयश्री देसाई या खरोखच देवदूत ठरल्या आहेत (Satara Karad Doctor Jayashree Desai medical aid in Malkapur Corona Hotspot)

कोरोनाच्या महामारीत पैशासाठी काहीही करतात, असा डॉक्टरांविषयी सर्वसामान्यांचा समज झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेची सेवा करायला मिळावी, आपल्या ज्ञानाचा वापर सर्वसामान्य नागरिकांना व्हावा, या उद्देशाने प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. यांच्यापैकी एक आहेत कराड मलकापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या महिला डॉक्टर जयश्री देसाई.

बहिणीला किडनी दान

प्रशांत देसाई आणि जयश्री देसाई हे दोघेही पती पत्नी व्यवसायाने डॉक्टर. डॉ. प्रशांत देसाई वाई (जिल्हा सातारा) येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तर डॉ जयश्री देसाई यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष खाजगी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्यांनी आपली एक किडनी बहिणीला दान केल्यानंतर 2020 पर्यंत त्या घरीच होत्या.

एप्रिल 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी करावा, अशी इच्छा त्यांच्या मनात आली. त्यांनी ती आपल्या पतीजवळ बोलून दाखवली. किडनी दान केल्यामुळे शारीरिक दृष्ट्या नाजूक आणि संवेदनशील असल्याने पती डॉ प्रशांत देसाई यांनी काम करण्याविषयी साशंकता व्यक्त केली. मात्र जयश्री यांची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून त्यांनी संमती दर्शवली.

मलकापूर उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी

डॉ जयश्री देसाई यांना कराड तालुक्यातील काले आरोग्य केंद्राच्या मलकापूर उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. मलकापूर हे शहर कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कराड तालुक्यात हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी डॉक्टर जयश्री देसाई या काम करत आहेत. आजपर्यंत मलकापूर शहरात 1790 कोरोना रुग्ण सापडले आहेत अशा ठिकाणी काम करत असताना जयश्री देसाई यांना कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेणे, त्यांची तपासणी करणे, होम अयसोलेटेड रुग्णांना घरी जाऊन तपासणे अशी कामे करावी लागतात.

स्वतःला संसर्ग होऊ न देणे, तसेच आपल्यामुळे घरच्यांसह इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे होते. या काळात जयश्री यांना स्वतःबरोबर कौटुंबिक समस्यांनाही तोंड द्यावं लागले. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असताना घरी सात वर्षांची लहान मुलगी. तिला सांभाळण्यासाठी कोणी नाही. पती वाई येथे नोकरीला, मोठा मुलगा निवासी शाळेत हॉस्टेलमध्ये. कामावर मुलीला घेऊन जाणे शक्य नाही, शेजाऱ्यांकडे ठेवून जाणेही शक्य नव्हते.

घरातला कुलूप लावून मुलीला ठेवलं

देसाईंनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. मुलीला घरात ठेवून बाहेरुन कुलूप घालून जयश्री देसाई अखंडपणे रुग्णसेवा करत राहिल्या. घरातील सीसीटीव्हीचा ॲक्सेस मोबाईलवर घेऊन पती पत्नी दोघेही घरात एकट्या असणाऱ्या मुलीवर लक्ष ठेऊन काम करत होते. तिला ऑनलाईन अभ्यासासाठी मार्गदर्शन करत होते. हे सर्व डॉक्टर देसाई दाम्पत्य पैशांसाठी करत नसून सामान्य माणसाला आरोग्य सेवा पुरवून समाधान मिळवण्यासाठी करत आहेत.

कोव्हिड योद्धा म्हणून गौरव

पहिल्या लाटेनंतर कोरोना रुग्णांचा ताण कमी झाल्यानंतरही डॉ जयश्री यांनी मलकापूर शहरात आरोग्य जनजागृतीचे काम सतत चालू ठेवले होते. छोट्या बैठकांमधून आरोग्य विषयी जनजागृती सुरु होती. पहिल्या कोरोना लाटेतील कामाची पोचपावती म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते कोव्हिडयोद्धा म्हणून गौरवण्यात आले आहे. डॉ. जयश्री देसाई या प्रतिकूल परिस्थितीत हिमतीने काम करत असल्याची शाबासकी काले आरोग्य केंद्राचे प्रमुख वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांनी दिली आहे

आई म्हणून मुलीला घरी कोंडून जाताना अतिशय वाईट वाटायचे, मात्र डॉक्टर म्हणून समाधान वाटायचे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत काम करुनही डॉ जयश्री देसाई समाधानी आहेत. कोरोना हॉटस्पॉटमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी काम करता आल्याचे त्या नम्रपणे मान्य करतात.

डॉक्टर पतीची खंबीर साथ

माझ्या पत्नीची खूप दिवसांपासून शासनाच्या आरोग्य सेवेत येऊन सेवा देण्याची इच्छा होती. प्रतिकूल परिस्थितीत उपाय सुचत गेले. कोरोनाच्या महामारीत डॉक्टर म्हणून चांगली सेवा देऊ शकलो, याचे आम्हाला समाधान असल्याचे जयश्री यांचे पती डॉ प्रशांत देसाई यांनी सांगितले

मलकापूर शहरात कोरोनाव्यतिरिक्तही सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याविषयी डॉ जयश्री देसाई यांना तळमळ असून सामान्य नागरिकांशी त्या थेट संवाद साधून आरोग्यविषयी माहिती जाणून घेतात, प्रबोधन करतात त्यामुळे त्यांचे आणि नागरिकांचे नाते घट्ट झाले आहे. त्या प्रत्येकाला आपल्या घरच्या डॉक्टर वाटतात.

सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाच्या सेवेत डॉ जयश्री देसाई सारखे अनेक डॉक्टर लाभले, तर अशा अनेक कोरोनाच्या लाटांना भिडण्याची हिंमत सामान्य माणसात येईल हे नक्की

संबंधित बातम्या :

गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डॉक्टर गदगदले

ऑक्सिजनअभावी नातेवाईकाला गमावलं, मित्राकडून गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडर, कारही विकली

(Satara Karad Doctor Jayashree Desai medical aid in Malkapur Corona Hotspot)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.