Satara doctor death : मध्यरात्री चेक-इन, सकाळी पेमेंट करते सांगून रूममध्ये गेली, नंतर… डॉक्टर महिलेचं शेवटचं संभाषण काय?
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला आहे. मधुदीप हॉटेलमध्ये घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तिच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या दोन नावांवरून पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मृत्यूपूर्वीचे 17तासांचे धागेदोरे उघड झाले आहेत. याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी जोर धरत आहे.

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर महिलेने फलटण मधीलच एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटननेन अख्खा महाराष्ट्र हादरून गेला असून सध्या सर्वत्र याच डॉक्टरबद्दल चर्चा सुरू आहे. मृत्यूपूर्वी तिने हातावर लिहीलेली सुसाईड नोट, त्यातील दोन नावं यामुळेही खळबळ माजली असून पोलीस बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनाहही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून अनेक नवे खुलासे होण्याची, बरीच नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान या डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी फलटणमधील ज्या हॉटेसलमध्ये चेक-इन केलं, त्या हॉटेल मालकानेही सीसीटीव्ही फुटेज जाहीर केलं असून त्यातूनही बरेच खुलासे झाले आहेत. ज्या रात्री त्या डॉक्टरने चेक इन केलं, तेव्हा झालेलं संभाषण ते, दुसख्या दिवशी तिचा मृतदेह आढळेपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा तपशीलाही आता समोर आला असून त्या 17 तासांमध्ये नेमकं काय घडलं, त्या महिला डॉक्टरचे संभाषण काय होते, अशा अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. सूत्रांनी या संदर्बात माहिती दिली आहे.
मध्यरात्री केलं चेक-इन आणि…
डॉक्टर महिलेने फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये 23 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास चेक-इन केलं. हॉटेल मालक भोसले यांनी त्यावेळचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार, ” डॉक्टर महिला ही मध्यरात्री दीडच्या आधी , साधाराण 1 वाजून 23 मिनिटांनी हॉटेलच्या गेटवर आली. ती दुचाकीवर आली आणि तेव्हा ती एकटीच होती. हॉटेलच्या सुरक्षारक्षाकाशी तिचं बोलणं झालं. मी बारामतीला जात आहे, पण लांबचा रस्ता आहे, एकटी आहे, एक रात्र राहू द्या, अशी विनंती तिने केल्याची ” माहिती भोसले यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितलं.
” तिने विनंती केल्यावर सुरक्षा रक्षकाने गेट उघडलं. थोड्याच वेळात ती रिसेप्शनवर पोहोचली, तिने चेकइन करण्यासाठी रजिस्टरमध्ये स्वतःच नावं नोंदवलं, आधार कार्डही दिलं. पेमेंट मी सकाळी करते, असंही त्या महिला डॉक्टरने सांगितलं. त्यानंर रात्री 1.30 च्या सुमारास ती महिला डॉक्टर तिला दिलेल्या 114 नंबरच्या रुममध्ये गेली.”
11 वाजेपर्यंतर कोणीच उघडलं नाही दार, संध्याकाळीही प्रतिसाद नाहीच..
आपण उद्या सकाळी निघणार असल्याचे त्या डॉक्टर महिलेने सांगितलं होतं, मात्र सकाळी 11 वाजल तरी तिने दार उघडले नाही, तेव्हा मॅनेजरने तिच्या खोलीचं दार ठोठावलं पण कोणीच प्रतिसाद दिला नाही, ना कोणी दार उघडलं. त्यानतंर थोड्या वेळाने दुपारी आणि मग संध्याकाळी खोलीचं दार पुन्हा वाजवण्यात आलं पण काहीच हालचला नव्हती, कोणाच्या वावरण्याचा मागमूस नव्हता. अखेर संध्याकाळू 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास, संचालक रणजीत भोसले हे उपस्थित असताना हॉटेलमधल डुप्लिकेट किल्लीने त्या रूमचे दार उघडण्यात आले, ती प्रोसेस व्हिडीओ रेकॉर्डही करण्यात आली. तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला, कारण ती डॉक्टर महिला समोर पंख्याला लटकलेली होती, तिचा मृतदेह पाहून सगळेच हादरले अशी माहिती सूत्रांनी दिली.
तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि डॉक्टर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतला. त्या डॉक्टर महिलेचे हॉटेलमधील शेवटचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
एसआयटीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी करा, गावकऱ्यांची मागणी
दरम्यान डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी मृत महिलेचे नातेवाईक, कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या मागण्यांसाठी आज बीडच्या वडवणी तालुक्यातील डॉक्टर महिलेच्या गावातील नागरिकांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं.
