Video: धक्का का मारतोस म्हणत, कॉलेजमध्येच दोघांची डोकी फोडली; साताऱ्यात महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

सातार्‍यातील डीजी कॉलेजवर शुक्रवारी दुपारी युवकांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. महाविद्यालयातच 8 ते 10 युवक एकमेकांना भिडल्यानंतर डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात आली.

Video: धक्का का मारतोस म्हणत, कॉलेजमध्येच दोघांची डोकी फोडली; साताऱ्यात महाविद्यालयीन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
साताऱ्यातील धनंजय गाडगीळ कॉलेजात दोन गटात हाणामारी
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:12 PM

साताराः सातारा शहरात (Satara City) महाविद्यालय परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. आज दुपारी धनंजय गाडगीळ कॉलेज (Dhananjay Gadgil College) परिसरात किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन बाहेरून आलेल्या युवकांनी (Fighting in two groups) महाविद्यालयातील दोघांना बेदम मारहाण करत त्यांची डोकी फोडली आहेत. या मारहाणीत दोघांही युवकांच्या डोक्याला जबर मार लागला असून याप्रकरणी संबंधित अज्ञात युवकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यापूर्वी देखील कॉलेज परिसरात युवकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळे पोलीस विभागाकडून परिसरात पेट्रोलिंग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.

सातार्‍यातील डीजी कॉलेजवर शुक्रवारी दुपारी युवकांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. महाविद्यालयातच 8 ते 10 युवक एकमेकांना भिडल्यानंतर डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात आली.

फ्री स्टाईलने हाणामारी

कॉलेज कॅम्पसमध्ये 10 मिनिटे फ्री स्टाईलने ही हाणामारी सुरु होती, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात हाणामारी सुरु होती, त्या ठिकाणी जाण्याचे कुणीही धाडस केले नाही. त्यामुळे कॉलेजे

एकमेकांना खुन्नस

कॉलेज परिसरात दुपारी साडेचार वाजता एकमेकांना खुन्नस काय देतोस या कारणावरु दोन गटांमध्ये वाद झाले. यावेळी वाद विकोपाला गेल्यानंतर एकमेकांच्या अंगावर धाऊन जाऊन दोघा युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. कॉलेज युवकांचा हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयितांनी दगड व इतर हत्यारे काढून मारहाण केली.

डोके फुटून रक्तबंबाळ

कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेने युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तर वाद सुरु झाल्यानंतर भितीपोटी अनेक विद्यार्थ्यांनी तेथून पळ काढला. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर एकाचे डोके फुटून रक्तबंबाळ झाला होता. त्यामुळे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांमध्येही या मारहाणीमुळे भितीचे वातावरण पसरले होते. अशा नेहमीच्या वादावादीमुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.