कोल्हापूरमध्ये नाही, पण सतेज आणि ऋतुराज पाटील प्रचारासाठी मुंबई-पुण्यात!

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात शेवटपर्यंत भाग घेतला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोघांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला. मात्र सतेज पाटलांनी त्यांचंही ऐकलं नाही. त्याच वेळी आता पाटील कुटुंबीय आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात पाहायला मिळत आहेत. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील …

कोल्हापूरमध्ये नाही, पण सतेज आणि ऋतुराज पाटील प्रचारासाठी मुंबई-पुण्यात!

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात शेवटपर्यंत भाग घेतला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोघांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला. मात्र सतेज पाटलांनी त्यांचंही ऐकलं नाही. त्याच वेळी आता पाटील कुटुंबीय आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात पाहायला मिळत आहेत.

सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करत आहेत. वाकड परिसरात काल झालेल्या रोड शोमध्ये ऋतुराज पाटील पार्थ यांच्यासोबत सहभागी झाले होते.

पवार कुटुंबातील पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याशी ऋतुराज यांची घनिष्ठ मैत्री आहे. ऋतुराज यांच्या विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमात  पार्थ आणि रोहित उत्साहाने दोन दिवस सहभागी झाले होते.

तर दुसरीकडे सतेज पाटील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारात मुंबईत सक्रिय झाले. त्यामुळे पाटील कुटुबीयांनी सुरु केलेल्या प्रचाराची चर्चा सुरु झाली आहे.

सतेज पाटील हे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. मात्र आता पाटील कुटुंब आघाडीच्या प्रचारासाठी कोल्हापुरातून बाहेर पुणे-मुंबईत दाखल झाले आहेत.

कोल्हापुरात सर्वाधिक मतदान

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. राज्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 70.70 टक्के तर हातकणंगलेत 70.28 टक्के इतकं मतदान झालं.

कोल्हापूरमधील लढत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी वैर आहे. मात्र या मतदारसंघात सतेज पाटील यांची निर्णायक भूमिका राहणार आहे. कोल्हापूरमध्ये 23 एप्रिलला मतदान झालं.

कोल्हापुरात आमचं ठरलंय

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मदत करण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात ठिकठिकाणी ‘आमचं ठरलंय’ असे बोर्ड लावले. त्याची चर्चा केवळ कोल्हापुरातच नाही तर राज्यभरात सुरु आहे. शरद पवार यांनीही या कॅम्पेनची दखल घेतली.

शरद पवार यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात लावलेले ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड चांगलेच जिव्हारी लागले आहेत. सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत. तुम्ही ठरवलंय तर मी सुद्धा कधी विसरणार नाही, अशी थेट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या 

‘आमचं ठरलंय’ वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने  

मुन्नांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये : चंद्रकांत पाटील  

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी   

पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका  

मुन्ना-बंटीमध्ये समेट घडवणं शरद पवारांनाही अशक्य!  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *