नागपूरकरांनो मला वाचवा! दीडशे वर्ष जुन्या झाडाची आर्त हाक

नागपूर : “या नागपूरकरांनो मला वाचवा”, शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका झाडाची ही आर्त साद आहे. नागपुरातील अंबाझरी बगीच्या शेजारी एक 150 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. हे झाड कधीही उन्मळून पडू शकतं. रस्ता रुंदीकरणाने या झाडाचं जगणं हिरावून घेतलंय. तेच झाड आता नागपूरकरांना ‘मला वाचवा’ अशी भावनिक आर्त साद घालत आहे. नागपुरातील प्रसिद्ध अशा …

नागपूरकरांनो मला वाचवा! दीडशे वर्ष जुन्या झाडाची आर्त हाक

नागपूर : “या नागपूरकरांनो मला वाचवा”, शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका झाडाची ही आर्त साद आहे. नागपुरातील अंबाझरी बगीच्या शेजारी एक 150 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. हे झाड कधीही उन्मळून पडू शकतं. रस्ता रुंदीकरणाने या झाडाचं जगणं हिरावून घेतलंय. तेच झाड आता नागपूरकरांना ‘मला वाचवा’ अशी भावनिक आर्त साद घालत आहे.

नागपुरातील प्रसिद्ध अशा अंबाझरी बगीच्या शेजारी हे वडाचं झाड आहे. गेली दीडशे वर्षे हे झाड इथे घडलेल्या प्रत्येक क्षणाचं साक्षीदार म्हणून उभं आहे. पण, चार वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण झालं आणि दीडशे वर्ष जुन्या या झाडाचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला. रस्ता रुंदीकरणाने या झाडाच्या एका बाजूची माती खचली आहे. त्यामुळे हे झाडं कधीही उन्मळून पडू शकतं. हे झाड वाचावं यासाठी पर्यावरणप्रेमी आता पुढे सरसावले आहेत.

नागपुरातील अंबाझरी बगीच्यात अनेक लोक येतात. आतापर्यंत हे वडाचं झाड इथे येणाऱ्या लहान-मोठ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत होतं. या झाडाबाबत अनेकांच्या चांगल्या आठवणीसुद्धा आहेत.

दीडशे वर्ष जुन्या या झाडाची जगण्यासाठी उदंड इच्छाशक्ती आहे. आज या झाडाला तुमची गरज आहे. आम्ही या झाडाची हाक आम्ही ‘टीव्ही 9 मराठी’ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण, ज्याप्रमाणे पाणी हे जीवन आहे, त्याच प्रमाणे झाडं सुद्धा जीवन आहे. झाडं जगली तरच तुम्ही आम्ही सारं काही. नाही तर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आवासून आहेच.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *