Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:15 PM, 26 Feb 2021
Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई आणि आईएससी बोर्ड परीक्षा स्थगित

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा काही प्रमाणात बंद आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे. (Schedule Of 10th And 12th Examinations Announced; The Exam Will Be Held On This Day)

10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार

नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलीय.

12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढती

राज्यात इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून, 18 जानेवारी 2021 रोजी 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली होती.

संबंधित बातम्या

Maharashtra Board Exam and Result Date 2021 : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Maharashtra School reopens | राज्यातील शाळा याच महिन्यात सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना तारीख सांगितली

Schedule Of 10th And 12th Examinations Announced; The Exam Will Be Held On This Day