पालघरः गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट वाढत आहे. त्यामुळे प्रशासनानंही आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, अशा नागरिकांना सूचनांचं पालन करण्यास सरकारकडून वारंवार सांगितलं जातं. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. पण चिमुकले आता आपल्या सवंगड्यांना भेटण्यासाठी शाळेत जाण्याचा हट्ट पालकांसमोर धरू लागलेत. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्राथमिक शाळा बंदच ठेवण्याची मागणी पालकांकडून केली जातेय. (Schooling For Elementary School Students; But Parents Refuse To Send Their Children To School)
पालघर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक शाळा बंद असल्या तरी पालकांसमोर मात्र या चिमुकल्यांकडून शाळेत जाण्याचा हट्ट केला जातोय. पाचवीच्या पुढील वर्ग हे सुरू करण्यात आलेत. मात्र पहिली ते चौथी या प्राथमिक शाळा कोरोनामुळे अजूनही बंदच आहेत. यामुळे अनेक महिन्यांपासून घरी बसलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हे घरातच राहून कंटाळले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या असलेल्या भीतीपोटी पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यात नकार देण्यात येतोय. Schooling For Elementary School Students; But Parents Refuse To Send Their Children To School
अनेक महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मित्र-मैत्रिणी भेटत नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याची इच्छा होत असल्याचं या चिमुकल्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शाळा सुरू करण्याची मागणी देखील या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी करत आहेत. मात्र कोरोना काळात घालून दिलेल्या नियम आणि अटी यांचा पालन या चिमुकल्यांना करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांकडून घेण्यात आलाय.
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील(Aurangabad सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत.
इतर बातम्या :
कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय
औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय
Schooling For Elementary School Students; But Parents Refuse To Send Their Children To School