रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार

रत्नागिरीतील सुरू झालेल्या शाळांबाबत आज पुनर्विचार होणार आहे. (Schools Ratnagiri close )

  • मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 8:51 AM, 24 Nov 2020

रत्नागिरी: कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा अखेर 23 नोव्हेंबर (Maharashtra Schools Re-Open) पासून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. पण राज्यात शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यानं पालकांच्या मनात भीतीनं घर केलेलं आहे. त्यामुळे सुरू झालेल्या अनेक शाळा पुन्हा एकदा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सुरू झालेल्या शाळांबाबत आज पुनर्विचार होणार आहे. (Schools In Ratnagiri Likely Re-Closing; The Decision Will Be Made Today)

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आज या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारपर्यंत पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असाही अंदाज बांधला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील निम्या शाळा कालपासून सुरू झाल्या होत्या. जवळपास 204 शाळांमध्ये 7 हजार 917 मुलांनी हजेरी लावली होती. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेवरून शिक्षणाधिकारी आणि आरोग्य विभागाने शाळा बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला, त्यावरच आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

60 टक्के कामकाज पालकांच्या संमतीवर अवलंबून

रत्नागिरी जिल्ह्यातील 458 शाळांपैकी 204 शाळा कालपासून सुरू झाल्या. 83 हजार 900 मुलांपैकी केवळ 2 हजार 281 पालकांची संमतीपत्र मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर 60 टक्के कामकाज पालकांच्या संमतीवर अवलंबून राहणार आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक 400 पालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. तर रत्नागिरी तालुक्यात केवळ 60 पालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा उघडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. तर सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, उस्मानाबादसह 22 ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 वी ते 12 वीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. सर्वाधिक 20 शिक्षक कोरोनाबाधित सापडल्यानंतरही श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर दिले जात होते, मास्क घालून वि्द्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. राष्ट्रगीत गात आठ महिन्यांनंतर शाळांना सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 481 शाळेत 70 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

संबंधित बातम्या

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह? 

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय