Pipari Wedding | पिपरीच्या नवरदेवाचा नवा प्रताप, कोव्हिड वॉर्डातील व्हिडीओ बनवून व्हायरल, दुसरा गुन्हा दाखल

पिपरीच्या कोरोना पॉझिटिव्ह नवरदेवाने रुग्णालयातच धिंगाणा घातला आहे. त्यानंतर या नवरदेवावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करुन त्याला पुन्हा क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Pipari Wedding | पिपरीच्या नवरदेवाचा नवा प्रताप, कोव्हिड वॉर्डातील व्हिडीओ बनवून व्हायरल, दुसरा गुन्हा दाखल

वर्धा : पिपरीचा कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव पुन्हा एकदा (Second Case Filed Against Pipari Groom) चर्चेत आला आहे. पिपरीच्या कोरोना पॉझिटिव्ह नवरदेवाने रुग्णालयातच धिंगाणा घातला आहे. त्यानंतर या नवरदेवावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करुन त्याला पुन्हा क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Second Case Filed Against Pipari Groom).

लग्नानंतर गुन्हा आणि आर्थिक दंड वाट्याला आलेल्या पिपरीच्या नवरदेवाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. या नवरदेवाने सेवाग्राम रुग्णालयात मंगळवारी चांगलाच धिंगाणा घालत रुग्णालयात मुक्त संचार केला. एवढ्यावरच दुल्हेराजा थांबले नाहीत, तर त्यांनी कोव्हिड वॉर्डातील व्हिडीओ बनवून व्हायरल केला. रुग्णालयाने मात्र वेळीच दखल घेत पोलिसात प्रकरण दाखल केले.

या व्हायरल व्हिडीओ व्हिडीओमध्ये महिला बाळाला घेऊन आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये परिचारिका बेशुद्ध पडल्याचे दिसत आहे. नवरदेवाने काढलेला हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. रुग्णालय आणि प्रशासनाची बदनामी करण्यासाठी नवरदेवाने हे व्हिडीओ व्हायरल केल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एवढंच नव्हे, तर बनविलेल्या हा व्हिडीओ वस्तुस्थितीला अनुसरुन असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं.

कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर आणि परिचरिकेसोबत अरेरावी करणे, रुग्णालयाची नाहक बदनामी करणे योग्य नसल्याचं सेवाग्राम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्रीप्रकाश कलंत्री यांनी म्हटलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केलेल्या तपासात नवरदेवाचा हा प्रताप समोर आला आहे (Second Case Filed Against Pipari Groom).

पिपरीच्या लग्नातील नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह येताच नवरीसह सात जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सेवाग्राम येथे रुग्णलयात उपचारासाठी दाखल झालेल्या नवरदेवाने मात्र, सेवाग्राम येथील कोव्हिड वॉर्डातील व्हिडीओ चित्रीकरण केले. सोबतच डॉक्टरांसह परिचरिकांसोबत गैरवर्तणुक केली. एवढंच नव्हे, तर कोरोना रुग्णाला बांधून दिलेल्या नियमांचे पालन सुद्धा त्याने केले नसल्याची तक्रार रुग्णालयाने केली आली. नवरदेवाने रुग्णालयात धिंगाणा घातल्यामुळे पोलिसांनी नवरदेवावर गुन्हा दाखल केला आला आहे.

पिपरी येथील या नवरदेव रुग्णासह नवरी, आई, मामे भाऊ आणि बहिण यांना रात्री कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, या नवरदेवाने सुट्टीपूर्वी रुग्णालयात धिंगाणा घातला. त्यामुळे आता त्याला पुन्हा सेवाग्राम रोडवरील शासकीय कोव्हिड सेंटरला क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, तिथेही त्याने चांगलाच गदारोळ घालत अरेरावी केली.

या नवरदेवाने चूक करत शहरात कोरोनाचा संसर्ग पसरवला. मात्र, यानंतरही तो तसाच वर्तन करत आहे. आज यावर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांना एकत्र करत पुढील कारवाई होईल. चर्चेत असलेल्या पिपरीच्या लग्नाची वरात धास्तावलेली असताना रुग्णालयातील नवरदेवाचे हे वर्तन प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणारी आहे.

Second Case Filed Against Pipari Groom

संबंधित बातम्या :

Wardha Corona | पिपरीच्या लग्नाने प्रशासन त्रस्त, नवरी, नवरदेवाची आई आणि दोन वऱ्हाड्यांना संसर्ग

वर्ध्यात नवरदेवाला कोरोना, वऱ्हाडी अमरावतीला परतले, क्वारंटाईनसाठी प्रशासनाची वरात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *