मुख्यमंत्री आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील संघाच्या स्मृतीभवन येथे रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. बैठकीत कुणा-कुणाची उपस्थिती? या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. येत्या चार …

मुख्यमंत्री आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील संघाच्या स्मृतीभवन येथे रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती.

बैठकीत कुणा-कुणाची उपस्थिती?

या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

येत्या चार ते पाच महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच राज्याच्या विधानसभा निवडणुका असतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघामधील महत्त्वाच्या नेत्यांच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरु झाली आहे.

भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारीतील संघटनांशी समन्वय राहावा किंवा असा समन्वय साधला जावा, असे प्रयत्न करण्यासाठी ही बैठक होती, असेही म्हटले जात आहे. मात्र, बैठकीचे नेमके कारण काय, बैठकीत आणखी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, हे अजून समोर आले नाही किंवा बैठकीत उपस्थित कुणीही अद्याप सांगितले नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *