मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

पंढरपूर : मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या विजय पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडून, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वादातून मध्यरात्री एक वाजता विजय पवार यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय पवार यांच्या गोळीबारात पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. विजय पवार यांनी पत्नीवर दोन गोळ्या …

मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

पंढरपूर : मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या विजय पवार यांनी पत्नीवर गोळ्या झाडून, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वादातून मध्यरात्री एक वाजता विजय पवार यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

विजय पवार यांच्या गोळीबारात पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. विजय पवार यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यांच्या पत्नीला सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पत्नीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

विजय पवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती गोष्टीतून वाद झाला होता. नेमक्या कोणत्या गोष्टीवरुन हा वाद झाला, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, याच वादातून विजय पवार यांनी टोकाचं पाऊल गाठलं आणि पत्नीवर गोळ्या झाडल्या, नंतर आत्महत्या केली.

या घटनेने सोलापूरसह राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

कोण होते विजय पवार?

सचिव विजयकुमार भागवत पवार हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवाशी आहेत. ते मुंबईत मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. याआधी त्यांनी जिल्हाधिकारी पदही सांभाळले आहे. मंगळवेढा तालुक्यातील जिल्हाधिकारी बनणारे ते पहिले व्यक्ती होते. नुकतीच त्यांची नियुक्ती मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *