ज्येष्ठ विचारवंत अविनाश डोळस यांचं निधन

अमित फुटाणे, टीव्ही9 मराठी, औरंगाबाद: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अविनाश डोळस यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, नेते, विचारवंत, प्रख्यात साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. विद्यार्थी दशेपासून विविध जनआंदोलनाच्या माध्यमातून परिवर्तन चळवळीत त्यांनी कार्य केल्यानं साहित्य, शिक्षण, परिवर्तन चळवळ, राजकारण या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या …

ज्येष्ठ विचारवंत अविनाश डोळस यांचं निधन

अमित फुटाणे, टीव्ही9 मराठी, औरंगाबाद: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अविनाश डोळस यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, नेते, विचारवंत, प्रख्यात साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. विद्यार्थी दशेपासून विविध जनआंदोलनाच्या माध्यमातून परिवर्तन चळवळीत त्यांनी कार्य केल्यानं साहित्य, शिक्षण, परिवर्तन चळवळ, राजकारण या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

अविनाश डोळस हे राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य, साधने आणि प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. महासगर, मराठी दलित कथा, आंबेडकरी विचार आणि साहित्य, आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ ही त्यांची काही पुस्तके.

मिलिंद महाविद्यालयात मराठी विभागात प्राध्यापक म्हणून काम करत असताना, मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडचणी त्यांनी दूर केल्या. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. अलिकडे निर्माण झालेल्या भारिप आणि एमआयएम वंचित आघाडीचे ते प्रमुख मार्गदर्शक होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *