सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्राकडे परवान्यासाठी तातडीनं अर्ज करणार; आदर पुनावालांची माहिती

दोन आठवड्यांत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्राकडे परवान्यासाठी अर्ज करणार (Serum Institute Will Immediately Apply To The Center For a License For Corona Vaccine; Says Adar Poonawalla)

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 8:41 AM, 29 Nov 2020
Adar Poonawalla UN Conference

पुणे : येत्या दोन आठवड्यांत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे. या लसीचं वितरण हे सुरुवातीला भारतातच केलं जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच आफ्रिकेतील देशांमध्ये लसीचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे. (Serum Institute Will Immediately Apply To The Center For a License For Corona Vaccine; Says Adar Poonawalla)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (28 नोव्हेंबर) कोरोना लसीची निर्मिती सुरू असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. आदर पुनावाला आणि सिरममधील संशोधकांकडून त्यांनी लसीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. कोरोना लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.

रोना लसीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याचं सर्वात आधी वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर आशिया खंडात या लसीचं वितरण करण्यात येणार आहे. आमच्याकडे कोरोना लसीच्या वितरणाचा प्लॅनही तयार आहे. येत्या जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची लस तयार झाल्यावर त्याची घोषणा आरोग्य मंत्रालायकडूनच केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. लसीच्या किमतीवर चर्चा नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर रोजी सिरममधील लस निर्मितीबाबतचा आढावा घेतला होता. त्यांच्याशी कोरोना लसीवर सखोल चर्चा झाली. लसीकरणाच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. तसेच लसीकरणाच्या साठवणुकीचा आढावाही त्यांनी घेतला. मात्र कोरोना लसीच्या किमतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मोदींचा दृष्टिकोन अत्यंत समतोल वाटला. मोदींना लसीबाबतची खूप माहिती आहे. ते विविध लसींबद्दल भरभरून बोलत होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • पंतप्रधान मोदींना लसीसंबंधीची खूप माहिती
  • मोदी विविध लसींबद्दल भरभरून बोलले
  • लसीकरणाच्या वितरणाचा प्लॅन तयार
  • युरोपियन देशही अॅस्ट्रा झेनेकोवर लक्ष ठेवून
  • कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी 2 आठवड्यात परवान्यासाठी अर्ज करणार
  • लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात (Adar Poonawalla addressing press conference on COVID-19 vaccine)

(Serum Institute Will Immediately Apply To The Center For a License For Corona Vaccine; Says Adar Poonawalla)

संबंधित बातम्या:

Adar Poonawalla : आधी भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य : पुनावाला

मिशन कोरोना व्हॅक्सीन! अहमदाबाद, हैदराबादनंतर पंतप्रधान मोदी सिरममध्ये; संशोधकांशी साधला संवाद