अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सात मालमत्तांचा लिलाव, तारीख ठरली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा सफेमा म्हणजेच स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर अ‍ॅक्ट अंतर्गत (SAFEMA act) लिलाव होणार आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सात मालमत्तांचा लिलाव, तारीख ठरली
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 9:06 AM

रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) संपत्तीचा सफेमा म्हणजेच स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर अ‍ॅक्ट अंतर्गत (SAFEMA act) लिलाव होणार आहे. खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊदचे मुळ गाव असून या गावातील दाऊदच्या बंगल्यासोबत सात मालमत्तेचा लिलाव होणार आहे. दाऊदची संपत्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी उत्सूकता दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Seven properties of the underworld don Dawood Ibrahim will be auctioned off )

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल (02 नोव्हेंबर) दाऊदच्या मालमत्तेची पाहणी केली. या मालमत्तेची विक्री करण्यासाठी वित्त मंत्रालयाने दाऊदच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जागेवर लिलाव होणार नाहीत. 10 नोव्हेंबर रोजी सर्व मालमत्तांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव केले जाणार आहेत. स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटरच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दाऊदची मालमत्ता खरेदी करु इच्छिणारे 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. रत्नागिरीतील खेडमध्ये असणाऱ्या मुंबके गावात मोस्ट वॉन्टेड आरोपी दाऊदचा बंगला आहे. तीन मजली असलेला हा बंगला दाऊदची आई अमिना आणि बहीण हसीना पारकर यांच्या नावे आहे. याशिवाय दाऊदच्या मुंबके गावात विविध ठिकाणी जमिनी आहेत. या सर्व मालमत्तांची खरेदी गुन्हेगारी पैशातून करण्यात आली आहे.

खेडमध्ये दाऊदचा बंगला

खेडमध्ये असणारा तीन मजली अलिशान बंगला हा दाऊदच्या बहिणीच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावे आहेत. सध्या दाऊदचे संपूर्ण कुटूंब मुंबईतील पाकमोडीया स्ट्रीटवर असलेल्या फॅल्टमध्ये राहतात. मात्र दाऊदचे कुटूंब 1980 दरम्यान खेडच्या बंगल्यात राहायचे. त्यानंतर 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर या बंगल्यात कोणीही राहायला आलं नाही. त्यानंतर हा बंगला ओस पडला. आता हा बंगला अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या बंगल्याच्या भितींवर काही लोकांनी लिखाण केले आहे. अनेक वर्षापासून ओस पडलेल्या या बंगल्याभोवती मोठमोठी झाडे वाढली आहे. असं असलं तरीही अनेक पर्यटक दिवसेंदिवस या बंगल्याभोवती जाऊन सेल्फी घेतात. त्यामुळे दाऊदचा हा बंगला पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे.

मुंबके गावात दाऊद इब्राहिमचे कुटुंब सुमारे 40 दशकांपूर्वी वास्तव्य करीत होते. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांना जेव्हा मुंबई पोलिसात नोकरी मिळाली तेव्हा ते आपल्या कुटूंबासह मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटमध्ये स्थायिक झाला. दाऊदही मुंबईला स्थायिक झाला.

दाऊदने मुंबईत गुन्हेगारी जगात आपले पाऊल ठेवले. बाकीचे कुटुंब मुंबईत गेले तरीही दाऊदच्या चार बहिणींपैकी एक बहीण बरीच वर्ष येथे राहिली. तिच्या मृत्यूनंतर दाऊदचं घर ओसाड पडलं. तस्करीच्या आरोपावरुन फरारी घोषित झाल्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

सफेमा कायद्यांतर्गत दाऊद इब्राहिम आणि तस्कर इकबाल मिर्ची यांच्या जप्त केलेल्या मालमतेचा 10 नोव्हेंबरला लिलाव होणार आहे. त्यातील सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक म्हणजे त्याचा बंगला. 30 गुंठे जमिनीवर पसरलेल्या या बंगल्याचे राखीव मूल्य 5 लाख 35 हजार 800 रुपये ठेवण्यात आले आहे. बोली लावणाऱ्यांना 1 लाख 35 हजार रुपये स्टेटमेंट द्यावे लागेल.

संबंधित बातम्या

Special Report | दाऊदच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख?

Special Report | दाऊदची उद्धव ठाकरेंना धमकी? निनावी फोनद्वारे ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

(Seven properties of the underworld don Dawood Ibrahim will be auctioned off )

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.