मोदी मला शिव्या देतात, मी काय घोडं मारलंय? : शरद पवार

मोदी मला शिव्या देतात, मी काय घोडं मारलंय? : शरद पवार

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. मोदी जेथे जातात तेथील सभेत गांधी नेहरूंसह मला शिव्या देतात. मी काय घोड मारलंय यांचं मला कळत नाही? असा उपरोधिक सवाल पवार यांनी केला. तसेच उगाच दुसऱ्याच्या घरात डोकाऊ नका. तुम्ही जर हे बंद केलं नाही, तर आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, असा सुचक इशाराही पवारांनी मोदींना दिला. ते उस्मानाबाद येथे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. उस्मानाबाद येथून आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील निवडणूक मैदानात आहेत, तर शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून अर्जून सलगर निवडणुकीत उभे आहेत.

पवार म्हणाले, ‘माझ्या घरात कटकटी नसताना त्या मोदींना कशा कळाल्या? दिल्लीला गेल्यावर मोदींना तुम्हाला कोणी सांगितले? हे याबाबत विचारणार आहे. आम्हाला घर कुटुंब चालवायचा अनुभव आहे. आम्ही चालवतो आहे. हा एकटा माणूस. यांना काय घर माहिती? यांनी कधी घर बघितलं आहे? कधी ऐकलं आहे? मी एकदा दोनदा त्यांच्या घरी मिटींगला गेलो. त्यावेळी घरात कोणी दिसतंय का हे बघितलं. मात्र, त्यांच्या घरात तशी काही भानगड नाही. असं असतानाही मोदी दुसऱ्याच्या घरात डोकावतात. म्हणून मोदींना सांगावं लागले, दुसऱ्याच्या घरात डोकाऊ नका. याच्या घरात भांडणं आहे, त्याच्या घरात कटकटी आहेत हे जर तुम्ही सांगत बसला, तर आम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे. उगाच जास्त बोलायला लाऊ नका. आम्ही गावाकडली माणसं आहोत, मग गावरान भाषेत सांगू. त्यामुळे हे थांबवा.’

आपल्या कुटुंबाविषयी बोलताना पवार म्हणाले, ‘आम्ही 7 भाऊ आहोत. त्यातील काही हयात नाहीत, त्यांचे निधन झाले. बहिणींचीही लग्ने झाली. आम्ही एकत्र राहतो. एकमेकांच्या अडीअडचणीला उभे राहतो, मदत करतो. आमचं कुटुंब एकत्र आहे.’ यावेळी त्यांनी मोदी आपल्या भाषणांमध्ये त्यांनी काय केलं हे सांगण्याऐवजी इतरांवर टीका करण्यातच धन्यता मानत असल्याचा मुद्दाही पवार यांनी उपस्थित केला.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *