शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, अजित पवारही उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे (Sharad Pawar meet Uddhav Thackeray). सह्याद्री अतिथीगृहावर या दोघांमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली.

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, अजित पवारही उपस्थित
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 3:47 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे (Sharad Pawar meet Uddhav Thackeray). सह्याद्री अतिथीगृहावर या दोघांमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक खबरदारीच्या गोष्टी केल्या जात आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकार करत असलेल्या कामाचीही माहिती दिली आहे. मात्र, जगभरात कोरोनावर नियंत्रणासाठी आरोग्यविषयक आणीबाणी घोषित केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. दोघेही यावर अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही चांगलं धोरण अवलंबता येईल का यावर त्यांनी चर्चा केली. ऐरोलीमध्ये संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्या व्यतिरिक्त सर्वत्र व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुका मागे पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.”

सह्याद्री अतिथीगृहात सामाजिक न्याय विभागाचीही आढावा बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठकीही घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे स्वतः शरद पवार सामाजिक न्याय विभागाकडे विशेष लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतंय.

संबंधित बातम्या:

‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ म्हणणारा आमदार विधानसभेच्या उपाध्यक्षपदी

राज्यसभा निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीतील चौथ्या जागेचा तिढा सुटला

संबंधित व्हिडीओ:

Sharad Pawar meet Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.