राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर, शरद पवारांकडून संताप व्यक्त

राज्यात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. मात्र, तरीदेखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे (Sharad Pawar nervous on people who not follow rules).

राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर, शरद पवारांकडून संताप व्यक्त


रायगड : राज्यात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. मात्र, तरीदेखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. कोरोना विषाणू घातक आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ते रायगडमधील रोहा येथे बोलत होते (Sharad Pawar nervous on people who not follow rules).

“मी आता येताना आदिती आणि तटकरे साहेबांना दाखवतो होतो, रस्त्याने दहा माणसं दिसली त्यापैकी सात माणसांच्या तोंडावर मास नव्हतं. सगळे लोकं मला हात दाखवत होते. नमस्कार करत होते. मी म्हटलं मास्कचं काय? तर त्यावर कुणी बोलत नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले (Sharad Pawar nervous on people who not follow rules).

“लोकांनी मास्क वापरणं सोडून दिले. मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याबद्दल जे जाणकर लोकं आहेत त्यांच्याशी माझा संपर्क असतो. देशाच्या आरोग्य खात्याशी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी मी गेल्या दोन दिवसांपासून बोलतोय. तर त्यांनी मला सांगितलं, शासन कदाचित या निष्कर्षावर येईल, हा विषाणू थोडा वेगळा आहे. जादा घातक आहे. त्यामुळे काळजी घेतली नाही. तर आपल्याला परिणाम भोगावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने खबर घेतली पाहिजे. पण आपण सगळे राजे आहोत. लोक म्हणतात आम्ही पळवला कोरोना विषाणूला”, असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यात कोरोनाचा कहर वाढला

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अमरावती आणि अचलपूर शहरात पुढच्या सात दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर नाशिकमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI