राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नाही; पवारांचा टोला

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी केली टीका (sharad pawar on income tax notice)

राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नाही; पवारांचा टोला

मुंबई: आयकर विभागाची पहिली नोटीस मलाच आलीय. संपूर्ण देशात सरकारचं आमच्यावरच अधिक प्रेम दिसतंय. त्यामुळे या नोटिसीला उत्तर देणार आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी केंद्रसरकारची खिल्ली उडवली आहे. (sharad pawar on income tax notice) तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ही टीका केली. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राची छाननी करण्यात येत आहे. त्याबाबत पवारांना पत्रकारांनी छेडले असता, मला पहिली नोटीस इन्कम टॅक्स कार्यालयाकडून आली आहे. अजून सुप्रियाला आली नाही. काल संध्याकाळपर्यंत सुप्रियाला नोटीस येईल असं मी ऐकत होतो. चांगली गोष्ट आहे. देशातील इतक्या सदस्यांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला, असं पवार म्हणाले.

या नोटिसीतून मला काही माहिती विचारण्यात आली आहे. त्यामुळे नोटिसीचं उत्तर द्यावं लागेल. नाहीतर दंड असतो त्यामुळे त्या नोटिसीचं उत्तर देणार आहे, असंही ते म्हणाले. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडी सरकार आहे म्हणून जाणूनबुजून नोटीस बजावण्यात आली आहे का? असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर देणं पवारांनी टाळलं.

राज्यसभेत राष्ट्रवादी दिसली नाही, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता या शेतकरी बिलावर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल आणि लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवट म्हणजे गंमत आहे का?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येणार असल्याचे विविध लोक सांगत आहेत, त्याबाबत तुमचं मत काय? असं पवारांना विचारलं असता हे विविध लोक कोण आहेत? त्यांचा संपूर्ण देशावर काय प्रभाव आहे?, असं सांगतानाच राष्ट्रपती राजवट लागू करणं गंमत आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाविषयीही आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करायचं होतं. त्यामुळे मी दिल्लीला गेलो नाही. मराठा आरक्षणप्रश्नी तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकलं पाहिजे. मराठा आरक्षणावरील स्थिगिती उठवली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका असून सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं. (sharad pawar on income tax notice)

संबंधित बातम्या :

शरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

(sharad pawar on income tax notice)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *