मला देशाच्या राजकारणाची हवा कळते : शरद पवार

नांदेड : मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत आहे. जनमानसाच्या मनातलं चित्र बदलत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलं. आज नांदेड इथे कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार नेमकं काय म्हणाले? “मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत …

मला देशाच्या राजकारणाची हवा कळते : शरद पवार

नांदेड : मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत आहे. जनमानसाच्या मनातलं चित्र बदलत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलं. आज नांदेड इथे कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलत आहे. जनमानसाच्या मनातलं चित्र बदलत आहे. शेजारच्या दोन तीन राज्यातील लोकांनी जी दिशा दिली आहे, ते पाहता हे बदलत्या हवेचं द्योतक आहे.”, असे शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका

“पुलवामा हल्ल्यात एकाच ठिकाणी 40 जवान शहीद  झाले. अशावेळी बाकी सगळे विषय सोडून एकत्र येऊन सैन्याच्या पाठीशी थांबण्याची गरज आहे. यासाठी केंद्राने आम्हाला बोलावलं, आम्ही गेलो. राजकारण निवडणूक बाजूला ठेवून आम्ही सरकारच्या सोबत आहोत. याबाबतची भूमिका आम्ही घेतली. एवढं मोठं संकट आहे. सगळे लोक हजर राहायला हवे होतं, पण सत्ताधारी पक्षाचे लोकच हजर नव्हते.”, असे म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

सत्ता कधी येते, कधी जाते, सत्ता असो नसो लोकांशी असलेली बांधिलकी महत्वाची आहे, असेही यावेळी पवारांनी नमूद केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *