शरद पवारांकडून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर?

राष्ट्रवादीमध्ये 'महाराष्ट्र सांभाळण्यासाठी' अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती. पण शरद पवार यांनी सूचक वक्तव्य अप्रत्यक्षपणे उमेदवारच जाहीर केलाय, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवारांकडून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर?

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) हे भविष्यात महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळू शकतात, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. राष्ट्रवादीमध्ये ‘महाराष्ट्र सांभाळण्यासाठी’ अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती. पण शरद पवार यांनी सूचक वक्तव्य अप्रत्यक्षपणे उमेदवारच (NCP Jayant Patil) जाहीर केलाय, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत शरद पवार बोलत होते. साहित्यरत्न जन्मभूमी पुरस्कार डाव्या पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार याला प्रदान करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

विकासकामं होत नाही, असं सांगत काही नेते पक्ष सोडत आहेत. मात्र सत्ता असो वा नसो, कामं कशी करून घ्यायची हे राजकीय नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे. जयंत पाटील यांच्याप्रमाणे अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य प्रस्ताव केला तर नक्की विकासकामे मंजूर होतात. त्यासाठी सत्ता पाहिजेच असं नाही, असं म्हणत शरद पवारांनी जयंत पाटलांचं कौतुकही केलं.

सध्या समाजा-समाजात दुफळी निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात भिन्नता असल्याचा अपप्रचारही करण्यात आला. त्यामुळे युवकांनी जबाबदारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती बघता युवकांवर मोठी जबाबदारी आली असल्याचं शरद पवार म्हणाले.

“भाजपकडून पक्षप्रवेशासाठी दबाव”

भाजपकडून पक्षप्रवेशासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते दिलीप तात्या पाटील यांनी केलाय. भाजप प्रवेशासाठी मला अनेक आमिषं दाखवण्यात आली. अनेक नेत्यांनी मला फोन केले, तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांना भेटा, असं सांगितलं. महसूलमंत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त केलं आणि बँकेवर प्रशासक नेमला. शिवाय चार-पाच बैठका लावून पुन्हा तुम्हालाच अध्यक्ष करतो आणि जयंत पाटलांच्या विरोधात तुम्हालाच तिकीट देऊ, असंही आमिष दाखवलं, असा आरोप दिलीप पाटील यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *