मुंबईः ”मी एक चांगलं काम केलंय. मी नेमकं काय काम केलं, त्या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार असून, ते पुस्तक पवार यांना पाठवणार आहे, शरद पवारांना माझी लाज वाटणार नाही”, असं भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणालेत. प्रवीण दरेकरांनी मुंबईत आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar Will Not Feel Ashamed Of Me Says Praveen Darekar )
तत्पूर्वी इंदिरा गांधी यांनी अभ्यास करून निष्कर्षासाठी निवृत्त न्यायाधीश नेमले होते. महाजन समितीचा अहवाल महाराष्ट्राच्या विरोधात होता. अंतुले यांचं काम फार मोठं होतं. या पुस्तकात याचा उल्लेख नाही, अशा गोष्टी आल्या पाहिजेत. आजही आपण निप्पाणीसाठी भांडतो. एका बैठकीत निप्पाणी देण्याचा निर्णय ही केला होता.
संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडणारः शरद पवार
सीमावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजूट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची भूमिका राज्य शासनाची असल्याचे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांच्या निनादात या आवाहनाचे स्वागत करण्यात आले.
“रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे” तसेच “बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” या सीमावासीयांच्या उत्स्फूर्त घोषणांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमास सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सीमा भागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या
शेतकरी आंदोलनावरुन प्रवीण दरेकर-शरद पवार आमनेसामने, पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर…
Sharad Pawar Will Not Feel Ashamed Of Me Says Praveen Darekar