बारामतीसह 43 जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा : शरद पवार

बारामती : लोकसभेच्या निवडणुका साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊन एप्रिल महिन्यात मतदान होईल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलाय. भाजपकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळी आश्वासने दिली जातायत. मात्र त्याबाबत फारसं गांभीर्याने घ्यावं असं काही नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीसह 43 जागा जिंकण्याच्या वक्तव्यावर शरद पवार …

बारामतीसह 43 जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा : शरद पवार

बारामती : लोकसभेच्या निवडणुका साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊन एप्रिल महिन्यात मतदान होईल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलाय. भाजपकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळी आश्वासने दिली जातायत. मात्र त्याबाबत फारसं गांभीर्याने घ्यावं असं काही नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीसह 43 जागा जिंकण्याच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी त्यांना शुभेच्छाच आहेत, त्यांनी 48 जागांची तयारी करायला हवी, अशा शब्दात टोला लगावला. त्याचवेळी त्यांनी भाजपकडून होणाऱ्या वक्तव्यांवर सडेतोड भाष्य करत भाजपाध्यक्ष अमित शाह, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार

बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपकडून केल्या जाणार्‍या वक्तव्यांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी भाजपच्या वेगवेगळ्या धोरणांवरही टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी पवारांनी आपल्या वयाचा विचार करावा असे व्यक्तव्य केलं. त्यावर माझ्या वयाची त्यांना चिंता आहे हे ऐकून समाधान वाटल्याचं सांगत, शरद पवार यांनी ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाचाही विचार करत असतील अशी मला खात्री आहे. ते माझ्यापेक्षा वडीलधारे आहेत. त्यांच्या पक्षामध्ये अनेक जण माझ्यापेक्षा वडीलधारे आहेत.. असे अनेकजण मी संसदेत बघतो, असं म्हणत चंद्रकांत पाटलांना उपरोधिक टोला लगावलाय.

मुख्यमंत्र्यांना बारामतीची जागा जिंकण्यासाठी शुभेच्छा

आम्ही बारामतीसह महाराष्ट्रातील 43 जागा जिंकू, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केला. यावर पवारांनी मिश्कील टिप्पणी करत भाजपला शुभेच्छा दिल्या. भाजपने 43 जागांपैकी 48 जागांची का तयारी केली नाही, असाही प्रश्न पवार यांनी केला. लोकशाहीमध्ये कोण काहीही बोलू शकतं, त्यांच्या तोंडाला लगाम घालू शकत नसल्याचंही ते म्हणाले.

“भाजपला गांभीर्याने घेण्याची गरज नाही”

अमित शाहांनी महाआघाडीवर केलेल्या टीकेबद्दल बोलताना शरद पवार यांनी त्यांची अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी तुलना करणं योग्य नसल्याचं म्हटलंय. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा नेता असतानाही आम्हाला बहुमत मिळालं आणि आम्ही यशस्वीपणाने दहा वर्षे राज्य केलं. त्यामुळे वाजपेयींच्या बरोबर अमित शाहांची तुलना करणे हा विनोदच होईल, अशा शब्दात अमित शाहांना टोला लगावला. भाजपने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेली धोरणं अजूनपर्यंत शेतकर्‍यांच्या पदरात पडलेली  नाहीत. त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून ते शेतकर्‍यांसंदर्भात धोरणे जाहीर करत आहेत. पण या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्यांना काही करायची वेळ लोक त्यांना येऊ देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही भाष्य केलं तर त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असं मला वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

”मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होऊ शकतात”

लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची चर्चा असल्याबाबत पवारांना विचारलं असता मला त्याविषयी माहिती नाही, यावर भाष्य  करु शकत नाही, मी जर काही बोललो तर ती बातमी देशपातळीवर जाते. ज्याची माझ्याकडे माहिती नाही त्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असा अंदाज पवारांनी व्यक्त केला. तसे झाले तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकतात. त्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.

“आघाडीत कसलीही अडचण नाही”

जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुठल्याच जागेची अडचण नाही. दोन-तीन जागा राहिल्या आहेत, त्याही आम्ही सोडवू. सांगोल्यात गेलो असताना  लोंकानी मी निवडणूक लढवणार आहे की नाही त्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली.. आपण त्यांना सांगितलं की अजून मानसिक तयारी झालेली नाही.. पण माझ्या सर्वच पक्षातील सहकाऱ्यांचा हट्ट आणि आग्रह आहे. त्यामुळे आजच्या आज एकदमच उत्तर देऊ शकत नाही, त्याबद्दल विचार करून सांगणार असल्याचं ते म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *