एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना; पाठींबा देण्यासाठी शिंदे समर्थकांनी भरली प्रतिज्ञापत्रं

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याने खरी शिवसेना कुणाची असा सामना रंगला आहे. हा वाद कोर्टात पोहचला आहे. अशातच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना; पाठींबा देण्यासाठी शिंदे समर्थकांनी भरली प्रतिज्ञापत्रं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:42 PM

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याने खरी शिवसेना कुणाची असा सामना रंगला आहे. हा वाद कोर्टात पोहचला आहे. अशातच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उल्हासनगरमध्ये(Ulhasnagar) शिंदे समर्थकांनी प्रतिज्ञापत्रं भरली आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना, हीच खरी शिवसेना असल्याचा उल्लेख या प्रतिज्ञापत्रात करण्यात आले आहे.

धनुष्यबाण कुणाचा? यावरून ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर आता खरी शिवसेना कुणाची, शिवसेनेचं चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा? यावरून ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू झालीये. आपल्याला जास्तीत जास्त पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा पाठींबा असल्याचं दर्शवण्यासाठी दोन्ही गटांकडून अशाप्रकारची प्रतिज्ञापत्रं सध्या कार्यकर्त्यांकडून भरून घेतली जात आहेत.

शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रं भरली

रविवारी उल्हासनगरमधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रं भरली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नैसर्गिक युती तोडून अनैसर्गिक युती केली, ज्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची गळचेपी झाली. बॉम्बस्फोटातील लोकांच्या संपर्कात असलेल्या मंत्र्यांची पाठराखण केल्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा झाली. तर एकनाथ शिंदे यांचा निर्णय हा बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा असून शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असा उल्लेख या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय.

कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न

एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा क्षेत्रात असलेल्या उल्हासनगर शहरात शिवसैनिकांनी खासदारांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. तर अजूनही शहरातले उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, माजी सभागृह नेते असे प्रमुख पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतंय.

शिंदे गटाचा पाठिंबा वाढतोय

एकनाथ शिंदे यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. 40 पेक्षा अधिक आमदार, 12 खासदार यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील विविध महापालिका, नगर परिषद, ग्राम पंचायत तसेच  शिवसेनेचे दिग्गज नेते शिंदे गटात सामील होत आहेत. इतकंच नाही तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सख्खे पुतणे निहार ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.