मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डी ग्रामस्थांचं समाधान, आंदोलन मागे : विखे पाटील

शिर्डींच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत मांडली. शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती भाजाप नेते आणि नगरचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Shirdi Saibaba Birthplace dispute) यांनी दिली.

Shirdi Saibaba Birthplace dispute, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिर्डी ग्रामस्थांचं समाधान, आंदोलन मागे : विखे पाटील

मुंबई : शिर्डींच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत मांडली. शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती भाजाप नेते आणि नगरचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Shirdi Saibaba Birthplace dispute) यांनी दिली. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या (Shirdi Saibaba Birthplace dispute)  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “शिर्डीच्या ग्रामस्थांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत मांडली. शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.  विकास करायला आमचा विरोध नाही हे आम्ही सांगितलं. कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या विकासास विरोध नाही”

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत विधान केल्यानंतर मोठा वाद झाला आहे (Saibaba Birthplace dispute). शिर्डीत बंदही पाळण्यात आला. मात्र, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिर्डीकर तात्पुरता बंद मागे घेत मुंबईला चर्चेस आले. (Saibaba Birthplace dispute). शिर्डीकरांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आता या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, साईंच्या जन्मभूमीच्या वादानंतर शिर्डीकरांनी कडकडीत बेमुदत बंदची घोषणा केली होती. रविवारी पहिल्या दिवशी शिर्डीत अगदी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे साईभक्तांची बरेच हालही झाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना बंद मागे घेत चर्चेसाठी बोलावलं. आज मंत्रालयात त्याच विषयी बैठक झाली.

शिर्डीकरांच्या शिष्टमंडळात कुणाचा सहभाग?

माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, साईचरीत्राचे अभ्यासक आणि शिर्डी गँझेटीयरचे लेखक प्रमोद आहेर, माजी नगराध्यक्ष आणि माजी विश्वस्त कैलास कोते, भाजपचे उत्तर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर, उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, शिर्डी साई मंदीराचे पुजारी बाळकृष्ण जोशी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डीचे ग्रामस्थ नितीन कोते, अभय शेळके, गणीभाई पठाण -अब्दुलबाबांचे वंशज आदी लोक या बैठकीला उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *