भर रस्त्यात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा, खिडकीतून कुणी-कुणाला डिवचलं ?

दोन्ही गटाकडून समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी करत असतांना हा सर्व प्रकार घडला असून अश्लील हावभाव केल्याचा ठाकरे गटाच्या महिलांचा आरोप आहे.

भर रस्त्यात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा, खिडकीतून कुणी-कुणाला डिवचलं ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 4:34 PM

Shivsena : शिवसेनेतील दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत (Mumbai) होणाऱ्या शिवसेना (Shivsena) दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते जात आहेत. त्यातच नाशिक मुंबई महामार्गावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात तुफान राडा झाला आहे. मेळावा सुरु होण्यापूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असून शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना गाडीतून इशारे करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याच वेळी भर रस्त्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडी अडवत आक्रमक होत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप दिला आहे. यावेळी मोठा राडा नाशिक – मुंबई महामार्गावर झाल्याचे दिसून आले आहे.

नाशिकमधून आज शिंदे आणि ठाकरे गटाचे समर्थक एकाच वेळेच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.

असे असताना घोटी जवळ दोन्ही गटाच्या वाहनांच्या रांगा जवळजवळ आल्या होत्या. त्यावेळी शिंदे गटाच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या महिलांना इशारे केले होते.

दोन्ही गटाकडून समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी करत असतांना हा सर्व प्रकार घडला असून अश्लील हावभाव केल्याचा ठाकरे गटाच्या महिलांचा आरोप आहे.

याच दरम्यान घोटी जवळ ठाकरे गटाच्या महिलांनी शिंदे समर्थकांच्या गाडी ला अडवून चोप दिल्याचे समोर आले आहे.

जीप मध्ये बसलेल्या शिंदे समर्थकांना बस मध्ये बसलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना घोषणाबाजी करतांना विचित्र हावभाव करत इशारे केले होते.

दसरा मेळाव्यासाठी जात असलेल्या नाशिकमधील हे दोन्हीही गट होते. यावेळी इतर समर्थकांनी हा वाद सोडविल्यानंतर दोन्ही गटाची वाहने पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.