“ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं समजलं, पण अशा गोष्टींपासून दूर राहावं”; शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याचा खडसे, महाजनांना सल्ला

सध्या राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे त्यांनी अशी टीका करण्यापासून दूर राहायला हवं," असा सल्ला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांना दिला. (gulabrao patil eknath khadse viral audio clip)

ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं समजलं, पण अशा गोष्टींपासून दूर राहावं; शिवसेनेच्या 'या' बड्या मंत्र्याचा खडसे, महाजनांना सल्ला
Girish-Mahajan-Eknath-Khadse
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 6:17 PM

मुंबई : “एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं मला आत्ताच समजलं. सध्या राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सध्यातरी या सगळ्यापासून दूर राहायला हवं,” असा सल्ला पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना दिला. एकनाथ खडसे (Eknath Khadse)आणि भाजप नेते गिरीश महाजान (Girish Mahajan) यांचं राजकीय वैर काही लपून राहिलेलं नाही. एकनाथ खडसे यांच्या व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लीपमधून ते पुन्हा दिसले. खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी बोलताना अनेक आक्षेपार्ह विधानं केली. खडसेंच्या या क्लीपनंतर राज्यात खळबळ ऊडाली. याच क्लीपविषयी विचारले असता गुलाबराव पाटील यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Shiv Sena leader Gulabrao Patil comment on Eknath Khadse viral audio clip on Girish Mahajan suggested to avoid contradictory comments amid Corona pandemic)

गुलाबराव पाटील काय म्हणाले ?

राज्यातील कोरोनास्थिती आणि लसीकरणावर चर्चा करण्यासाठी आज (28 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. गुलाबराव पाटील याच लसीकरणाची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला देत होते. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीप बद्दल विचारण्यात आले. यावर भाष्य करताना “एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लीप लिक झाल्याचं मला आत्ताच समजलं. या दोघांचं युद्ध नेहमीच सुरु असतं. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. तसेच आपल्या जळगाव जिल्ह्याला कोरोनापासून दूर कसं ठेवता येईल, हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे सध्यातरी अशा गोष्टींपासून दूर राहायलं हवं,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

खडसेंच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये नेमंक काय आहे ?

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन याच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधानं केली आहेत. “एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे खडसे म्हणाले. तसेच गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.

दरम्यान, ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली दिली. खानदेशी भाषेत आपण ‘ अमका तमका मेला का?’, असे सहज म्हणून जातो. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

इतर बातम्या :

Maharashtra lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल- राजेश टोपे

आता जयंत पाटलांच्या मुलाकडून ‘करेक्ट कार्यक्रम’, लसीचे पैसे CM फंडात!

‘गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो, फक्त पोरींचे फोन उचलतो’, एकनाथ खडसेंची वादग्रस्त ऑडिओ क्लीप व्हायरल

(Shiv Sena leader Gulabrao Patil comment on Eknath Khadse viral audio clip on Girish Mahajan suggested to avoid contradictory comments amid Corona pandemic)
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.