VIDEO: साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, ‘या’ नेत्याची उदयनराजेंशी गळाभेट; सत्तांतराच्या चर्चांना उधाण

शिवसेनेचे नेते आणि साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नरेंद्र पाटील यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. (shiv sena leader narendra patil meet udayanraje bhosale)

VIDEO: साहेब आता मुख्यमंत्री होताहेत, 'या' नेत्याची उदयनराजेंशी गळाभेट; सत्तांतराच्या चर्चांना उधाण
udayanraje bhosale
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 9:03 AM

सातारा: आधी पूजा चव्हाण प्रकरण, त्यानंतर सचिन वाझेप्रकरण आणि आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब… यामुळे राज्य सरकारवर संकटाचे ढग दाटलेले असतानाच शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. (shiv sena leader narendra patil meet udayanraje bhosale)

शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवलेले, परंतु आता शिवसेनेत नसलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. नरेंद्र पाटील हे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात रात्री अचानक रस्त्यात भेटले. यावेळी दोघांनीही गळाभेट घेतली. ही गळाभेट घेताना पाटील यांनी जोरजोरात हसत एकच जल्लोष केला. गळाभेट घेत असताना महाराज साहेब, साहेब आता मुख्यमंत्री होताहेत. काळजी नाही आता, असं पाटील म्हणाले. त्यामुळे आजूबाजूला उपस्थित असलेल्यांना एकच धक्का बसला. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या या विधानाने स्वत: उदयनराजेही दोन मिनिटे चक्रावून गेले. मात्र, असं असलं तरी पाटील यांच्या या विधानामुळे राज्यात सत्तांतर होण्याचे वारे वाहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उदयनराजे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक?

खुद्द शिवसेनेच्याच लोकसभेचा उमेदवार राहिलेल्या नेत्याने साहेब मुख्यमंत्री होताहेत काळजी नाही आता, असं उदयनराजेंना उद्देशून म्हटल्याने राज्यात सत्तांतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

दिल्ली भाजपकडून दखल

राज्यातील कोणत्याही प्रश्नावर भाजपचे राष्ट्रीय नेते भाष्य करत नाहीत. मात्र, परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी तात्काळ दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. या नेत्यांनी थेट अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. ठाकरे सरकारबाबत केंद्रीय पातळीवर काही हालचाली सुरू तर नाहीत ना?, अशी चर्चाही दबक्या आवाजात केली जात आहे.

परमबीर सिंगांचे आरोप काय?

परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

हॉटेल, बारकडून वसूलीचं टार्गेट

अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. (shiv sena leader narendra patil meet udayanraje bhosale)

संबंधित बातम्या:

आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट

गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा, तृप्ती देसाईंची मागणी

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

(shiv sena leader narendra patil meet udayanraje bhosale)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.