केडगाव हत्याकांड: जन्मठेप भोगत असलेला संदीप कोतकर सीआयडीच्या ताब्यात

अहमदनगर: भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांचे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जावई संदीप कोतकरला केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीआईडीने अटक केली. अहमदनगरचा माजी महापौर असलेला संदीप कोतकर हा अशोक लांडे खून प्रकरणात नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र त्याला सोमवारी रात्री केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाही करण्यात आली …

केडगाव हत्याकांड: जन्मठेप भोगत असलेला संदीप कोतकर सीआयडीच्या ताब्यात

अहमदनगर: भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांचे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले जावई संदीप कोतकरला केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीआईडीने अटक केली. अहमदनगरचा माजी महापौर असलेला संदीप कोतकर हा अशोक लांडे खून प्रकरणात नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र त्याला सोमवारी रात्री केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाही करण्यात आली आहे. सीआयडीकडून ही कारवाई करण्यात  आली.

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी सीआयडीने अहमदनगर येथील न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात, खुनाच्या कटात संदीप कोतकरचा सहभाग असल्याचं, नमूद केलेले आहे.  मात्र अनेक दिवस उलटूनही त्याला गुन्ह्यात वर्ग करून घेतले नव्हते. अखेर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आज त्याला अहमदनगरच्या जिल्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

केडगावमधील शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड

नगर जिल्ह्यातील केडगाव प्रभागातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वैमनस्यातून हत्याकांड झालं होतं. 7 एप्रिल 2018 रोजी वसंत ठुबे आणि संजय कोतकर या दोन शिवसैनिकांचा गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने वार करून भररस्त्यात निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप, त्यांचे सासरे आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांना अटक झाली होती.  याप्रकरणात संदीप कोतकर याचेही नाव आलेले आहे. मात्र एका खुनाच्या गुन्ह्यात तो नाशिक जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आता सीआईडीने त्याला केडगाव दुहेरी हत्याकांडात वर्ग करून अटक केली आहे.

पोटनिवडणूक

अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकीदरम्यान हे हत्याकांड झालं होतं.

या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल कोतकर हा काँग्रेसचा उमेदवार होता. तो विजयी झाला. त्याने शिवसेनेच्या विजय पटारे यांचा पराभव केला. या निवडणुकीतून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादावादी होती. त्याचं रुपांतर हत्याकांडात झालं.

याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *