शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचं गुऱ्हाळ सुरुच, सेना संपर्क प्रमुखांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर 5 नाराज नगरसेवकांची भेट घेण्यासाठी आज (15 जुलै) पारनेरमध्ये दाखल झाले (Bhau Korgaonkar meeting with Parner corporators).

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचं गुऱ्हाळ सुरुच, सेना संपर्क प्रमुखांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 9:12 PM

अहमदनगर : शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर 5 नाराज नगरसेवकांची भेट घेण्यासाठी आज (15 जुलै) पारनेरमध्ये दाखल झाले (Bhau Korgaonkar meeting with Parner corporators). नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहमदनगरचे माजी आमदार विजय औटी यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर  शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर नगरसेवक आणि माजी आमदारांच्या भेटीसाठी पारनेरमध्ये दाखल झाले. मात्र, नगरसेवक आणि विजय औटी यांनी एकत्र भेट घेणं टाळलं.

पाच नगरसेवक आणि  माजी आमदार विजय औटी यांनी भाऊ कोरगावकर यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली. विशेष म्हणजे नाराज नगरसेवकांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हजेरी लावली. त्यामुळे नगरसेवक अद्यापही लंके यांच्यासोबत असल्याची चर्चा पारनेरमध्ये रंगली आहे (Bhau Korgaonkar meeting with Parner corporators).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यादिवशी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू, असं भाऊ कोरगावकर यांनी पत्रकारांना सांगितलं.

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.

मात्र, पारनेरच्या नगरसेवकांची नाराजी काही केल्या संपताना दिसत नाही. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारे पत्र नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले.

“माजी आमदार विजय औटी यांच्यामुळे पक्ष संपण्याची चिन्हं आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करुन निष्ठावान शिवसैनिकाकडे धुरा सोपवावी, अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.” असे पत्र नगरसेवकांनी लिहिले होते.

संबंधित बातम्या :

पारनेर नगरसेवकांचे नाराजीनाट्य सुरुच, माजी आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी करा, उद्धव ठाकरेंना पत्र

पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, नंतर समजलं ते शिवसेनेचे : अजित पवार

शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.