Shiv Sena meeting LIVE : मंत्री संजय राठोड यांचं मंत्रिपद राहणार की नाही, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

| Updated on: Feb 27, 2021 | 10:36 PM

शिवसेना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 'वर्षा' शासकीय निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली (Shiv Sena meeting on Sanjay Rathore).

Shiv Sena meeting LIVE : मंत्री संजय राठोड यांचं मंत्रिपद राहणार की नाही, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक
शिवसेना नेते संजय राठोड

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजपकडून शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे येत्या 1 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. संजय राठोड यांच्यावरील आरोपांमुळे राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. त्यामुळे शिवसेना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली (Shiv Sena meeting on Sanjay Rathore). या बैठकीत राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. तर राठोड प्रकरणावर रणनिती आखण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Feb 2021 10:00 PM (IST)

    संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय नाही, बैठकीत रणनिती आखण्यावर चर्चा

    राठोड प्रकरणावर रणनिती आखण्यावर चर्चा झाली, मात्र संजय राठोडांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणताही निर्णय

  • 27 Feb 2021 08:01 PM (IST)

    राजीनाम्यावर तूर्तास चर्चा नाही, अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा

    राजीनाम्यावर तूर्तास चर्चा नाही, अधिवेशनाचं कामकाज कसं करायचं? या विषयावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेय

  • 27 Feb 2021 07:39 PM (IST)

    'संजय राठोड अवघड जागेवरचं दुखणं झालंय', राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांची प्रतिक्रिया

    "संजय राठोड अवघड जागेवरचं दुखणं झालंय, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देखील त्याचा जबाब द्यावा लागतोय. प्रसारमाध्यमातून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. पोलीस कोणाच्या तरी दबावात आहेत ते जवळपास निश्चित झालंय. जितक्या लवकर संजय राठोड राजीनामा देतील तेवढं बरंय, जेवढा उशिर होईल तेवढा त्याचा इम्पॅट राहणार नाही. जर सीबीआयपर्यंत हे प्रकरण गेलं तर पूजा आत्महत्या प्रकरणापर्यंत मर्यादित राहणार नाही, शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांना त्याचा फटका बसू शकतो, याशिवाय केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणाचा संबंध सर्वश्रूत आहे", अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी दिली.

  • 27 Feb 2021 07:28 PM (IST)

    वर्षा बंगल्यावर बैठक सुरु, मुख्यमंत्र्यांसब मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत.

Published On - Feb 27,2021 10:18 PM

Follow us
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.