चंद्रकांत पाटलांच्या छातीवर शिवसेनेचा धनुष्यबाण!

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण स्वतःच्या छातीवर लावून घेतले. मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी युतीच्या नेत्यांनी हा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच भाजपचे दिग्गज नेते असलेले चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या खिशावर धनुष्यबाण हे चिन्ह लावून घेतले. ज्या ठिकाणी युतीच्या …

चंद्रकांत पाटलांच्या छातीवर शिवसेनेचा धनुष्यबाण!

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण स्वतःच्या छातीवर लावून घेतले.

मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी युतीच्या नेत्यांनी हा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच भाजपचे दिग्गज नेते असलेले चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या खिशावर धनुष्यबाण हे चिन्ह लावून घेतले. ज्या ठिकाणी युतीच्या उमेदवाराचे धनुष्यबाण हे चिन्ह असेल त्याठिकाणी सगळे नेते धनुष्यबाण खिशावर लावणार आहेत. तर ज्या ठिकाणी कमळ हे चिन्ह असेल त्याठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते आपल्या खिशावर कमळाचे चिन्ह लावणार आहेत.

आपल्या उमेदवारांचे चिन्ह लोकांमध्ये बिंबवण्यासाठी युतीच्या नेत्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. त्याची सुरुवात चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघ हे दोन्ही शिवसेनेच्या वाट्याचे आहेत. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक तर हातकणंगलेत धैर्यशील माने हे युतीचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक यांच्यासमोर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक तर धैर्यशील माने यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचं आव्हान आहे.

सध्या जिल्हाभर चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेना नेते युतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. शिवसेनेसह भाजपचे नेतेही छातीवर सेनेचा धनुष्य लावून प्रचार करताना पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर 

आघाडीचे 48 पैकी 36 जागांवर उमेदवार जाहीर, संपूर्ण यादी एकाच ठिकाणी  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *