सरकारी जमीन गहाण ठेवून 20 लाखांचं कर्ज, शिवसेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप

बुलडाणा : थेट सरकारचीच जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रताप शिवसेनेच्या माजी सरपंचाने केला आहे. तब्बल दोन हेक्टर 20 आर जमिनीची बनावट 7/12 आणि इतर कागदपत्र बनवून बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून तब्बल 20 लाख रुपयांचे कर्ज शिवसेनेचे माजी सरपंच आणि नेते रवींद्र पाटील यांनी घेतले. एका तक्रारीनंतर सेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप उघडकीस आला असून, […]

सरकारी जमीन गहाण ठेवून 20 लाखांचं कर्ज, शिवसेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

बुलडाणा : थेट सरकारचीच जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रताप शिवसेनेच्या माजी सरपंचाने केला आहे. तब्बल दोन हेक्टर 20 आर जमिनीची बनावट 7/12 आणि इतर कागदपत्र बनवून बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून तब्बल 20 लाख रुपयांचे कर्ज शिवसेनेचे माजी सरपंच आणि नेते रवींद्र पाटील यांनी घेतले. एका तक्रारीनंतर सेनेच्या माजी सरपंचाचा प्रताप उघडकीस आला असून, सध्या रवींद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रवींद्र पाटील सध्या फरार आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहेत.

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे सरकारची गट नं. 584 मध्ये  8 हेक्टर 73 आर ई-क्लास जमीन असून, यापैकी दोन हेक्टर 22 आर जमिनीवर वैयक्तिक कर्ज घेण्यात आले असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश गवई यांनी समोर आणली होती. यासंदभार्त महसूल विभागाकडे त्यांनी तक्रारही दिली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान असे निदर्शनास आले की, सन 2010 मध्ये साखरखेर्डा येथील तलाठी आणि मंडळ अधीकारी यांनी माजी सरपंच रवींद्र पाटील यांच्यासोबत संगनमत करुन सदर जमीनीच्या बनावट 7/12 आणि इतर कागदपत्र तयार करून रवींद्र  पाटील यांनी बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीला  20 लाख रुपयाचे गहाण खत करुन दिले आणि त्यावर 20 लाखांचे कर्ज घेतले.

एवढेच नव्हे, तर सरकारी जमिनीच्या 7/12 वर 20 लाखांचा बोजाही चढवला. तर हे करत असताना बुलडाणा अर्बन को.ऑप.सोसायटीचे वकीलांनी कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता त्या जमिनीचा म्हणजेच 2 हेक्टर 22 आर जमीन रवींद्र  पाटील यांच्या मालकीचे असल्याचा सर्च रिपोर्ट अहवालही दिला. तर  बँकेकडे आरोपी रवींद्र पाटील हे त्या शासकीय जमिनीचे मालक असलयाचे भासवले आणि त्यावर 20 लाखांचे कर्ज घेतले.

यासंदभार्त उपविभागीय अधिकारी ह्यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली असता हे सिद्ध  झाले आहे. माजी सरपंच रवींद्र पाटील यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन शासनाच्या जमिनीवर कर्ज घेतले आणि व्यक्तिक कर्ज घेऊन ते परतफेड न करता बँकेसह बनावट 7/12 , फेरफार तयार करुन सरकारची फसवणूक केली आहे. याप्रकरणी महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी साखरखेर्डा येथील पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि त्यावरुन पोलिसांनी शिवसेनेचे माजी सरपंच तथा रवींद्र पाटील यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून आरोपी सध्या फरार आहे. मात्र या प्रकरणात अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.