‘संजय राऊत तुम्ही मोठे नेते असाल, पण भाषा जपून वापरा’, शिवेंद्रराजेंचा इशारा

"छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा आणि कोल्हापूरचे वंशज भाजपमध्ये आहेत. नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्यामुळे राजीनामा द्यावा", असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले.

'संजय राऊत तुम्ही मोठे नेते असाल, पण भाषा जपून वापरा', शिवेंद्रराजेंचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 1:33 PM

सातारा : “शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली भाषा  जपून वापरावी”, असा इशारा साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला (Shivendra Raje Bhosale on Sanjay Raut statement). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक काल (12 जानेवारी) प्रकाशित झाले. या पुस्तकावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे (Shivendra Raje Bhosale on Sanjay Raut statement).

“छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा आणि कोल्हापूरचे वंशज भाजपमध्ये आहेत. नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी”, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले.

“आमच्यापेक्षा म्हणजे छत्रपती घराण्याच्या वंशजपेक्षा इतर लोकांनीच शिवाजी महाराजांचे नाव जास्त वापरले. संजय राऊतांनी भाषा जपून वापरावी. आम्ही सर्वजण त्यांचा मान राखतो. त्यांनीदेखील आमचा मान राखावा”, असे शिवेंद्रराजे म्हणाले.

“माझी संजय राऊत यांच्याशी कधीही समोरासमोर भेट झालेली नाही. तुम्ही मोठे नेते असाल. त्याबद्दल काही वाद नाही. पण बोलताना जपून बोलावं एवढीच माझी विनंती आहे. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान आहे”, असेदेखील शिवेंद्रराजे म्हणाले.

संजय राऊत यांनी याप्रकरणी काल ट्विट केले होते. या ट्विटमध्ये राऊत यांनी शिवरायांची तुलना मोदींशी करणं महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर भाजप खासदार संभाजीराजे यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देत टीका केली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालावा”, असे संभाजीराजे म्हणाले होते.

संभाजीराजेंच्या प्रतिक्रियेनंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी “छत्रपतींच्या वंशजांनी चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन आपली भूमिका घ्यावी”, असा सल्ला दिला. त्यानंतर शिवेंद्रराजे यांनी राऊत यांना “भाषा जपून वापरा”, असे प्रत्युत्तर दिले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.