राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी युतीचेच उमेदवार आघाडीवर

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 12 वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर किरकोळ आघाडी होती. तर राष्ट्रवादी 5 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही …

loksabha election result 2019, राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी युतीचेच उमेदवार आघाडीवर

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 12 वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर किरकोळ आघाडी होती. तर राष्ट्रवादी 5 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळालेली नाहीत. महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपविरोधात राज्यभर 10 सभा घेतल्या होत्या. पण या सर्व ठिकाणी शिवसेना आणि भाजपचेच उमेदवार आघाडीवर आहेत.

पहिली सभा : नांदेड

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्ये काँग्रेसची पहिली सभा झाली. पण सध्या इथे भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.

दुसरी सभा : सोलापूर

सोलापुरात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे उमेदवार आहेत. राज ठाकरेंनी नांदेडनंतर सोलापूरकडे मोर्चा वळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुनी भाषणं दाखवून राज ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला. पण इथे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी आघाडीवर आहेत.

तिसरी सभा : इचलकरंची

हातकलणंगले मतदारसंघात आघाडीकडून राजू शेट्टी उमेदवार आहेत. पण शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने आघाडीवर आहेत.

चौथी सभा : सातारा

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे यांचा बालेकिल्ला आहे. इथे उदयनराजे आघाडीवर आहेत.

पाचवी सभा : पुणे

काँग्रेसकडून पुण्यात मोहन जोशी उमेदवार होते. इथे भाजपचे गिरीष बापट आघाडीवर आहेत.

सहावी सभा : पनवेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मतदारसंघातील पनवेलमध्येही राज ठाकरेंची सभा झाली. इथे शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत.

सातवी सभा : महाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातही राज ठाकरेंची सभा झाली. या मतदारसंघात कधी शिवसेना उमेदवार अनंत गीते, तर कधी सुनील तटकरे आघाडी घेत आहेत.

आठवी सभा : नाशिक

नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ हे उमेदवार होते. पण नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आघाडीवर आहेत.

नववी सभा : ईशान्य मुंबई

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मनोज कोटक अशी लढत होती. मनोज कोटक यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.

दहावी सभा : दक्षिण मुंबई

राज ठाकरेंनी त्यांच्या दहा सभांपैकी शेवटची सभा दक्षिण मुंबई मतदारसंघात घेतली. इथे काँग्रेसकडून मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी लढत होती. सध्या अरविंद सावंत आघाडीवर आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *