Sanjay Rathod Poharadevi: संजय राठोडांच्या पोहरादेवी दौऱ्यात शिवसेना नेत्यांचा सहभाग

  • अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 10:14 AM, 23 Feb 2021
Sanjay Rathod Poharadevi: संजय राठोडांच्या पोहरादेवी दौऱ्यात शिवसेना नेत्यांचा सहभाग
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंतीवार संजय राठोड यांच्या यवतमाळमधील घरी दाखल झाले. शिवसेनेचे आणखी काही नेतेही याठिकाणी दाखल होतील.

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पाठिशी शिवसेना (Shivsena) पक्षही उभा असल्याचे चित्र आता समोर येत आहे. कारण, पोहरादेवीला (Poharadevi) जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होताना दिसत आहे. हे सर्व नेते दौऱ्यातही संजय राठोड यांच्यासोबत असतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता बंजारा समाजापाठोपाठ शिवसेना पक्षही संजय राठोड यांच्या पाठिशी उभा असल्याचे दिसत आहे. Shivsena leader Sanjay Rathod will visit pohradevi temple today)

काही वेळापूर्वीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंतीवार संजय राठोड यांच्या यवतमाळमधील घरी दाखल झाले. शिवसेनेचे आणखी काही नेतेही याठिकाणी दाखल होतील.

संजय राठोड थोड्यावेळात पोहरादेवीच्या दिशेने निघतील. साधारण दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते पोहरादेवी मंदिरात दाखल होतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे:

1. संजय राठोड हे सकाळी साधारण 10 वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.
2. सकाळी 12 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
3. दुपारी दीड वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
4. दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.

पोहरादेवीच्या चारही बाजूने बॅरिकेटिंग, केवळ 25 लोकांनाच परवानगी, पोलिसांच्या सूचना

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) संकटात सापडलेले सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) आज पोहरादेवी (pohradevi) मंदिरात दर्शनाला जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
पोहरादेवी मंदिरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी केले बंद केले आहेत. बॅरिकेट लावून पोलिसांकडून रस्ते बंद केले आहेत. 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात केले आहेत. तसंच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित बातम्या:

PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा

Sanjay Rathod | शिवसेना नेते संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

Shivsena leader Sanjay Rathod will visit pohradevi temple today)