रुग्णालयात डॉक्टर नसल्याने शिवसेना आमदाराचा पारा चढला; म्हणाले, पुन्हा असं घडलं तर…

आम्ही आल्याच्या नंतर तुम्ही अर्धा तासाने येतात हे काही बरोबर नाही, असं म्हणत पुन्हा जर असं घडलं तर या डॉक्टरांना लाथा घाला. | Shivsena MLA doctor

रुग्णालयात डॉक्टर नसल्याने शिवसेना आमदाराचा पारा चढला; म्हणाले, पुन्हा असं घडलं तर...
काम करायचे असेल तर चांगले करा नसेल करायचे तर तस लिहून द्या.

हिंगोली: नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे भाजलेल्या अवस्थेतील रुग्णांवर ताटकळत राहण्याची वेळ आल्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) आमदाराने डॉक्टरांना चांगलेच फैलावर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shivsena MLA Santosh Banger scuffle with doctor in hospital Nanded Maharashtra)

जखमींना भेटण्यासाठी कळमनुरी विधान सभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. आमदार दाखल झाले तेव्हा डॉक्टर गणेश बंड्डेवार रुग्णालयात आढळून आले नाहीत. त्यांना बोलवून घेतल्यानंतर आमदार डॉक्टरांवर वर चांगलेच घसरले. काम करायचे असेल तर चांगले करा नसेल करायचे तर तस लिहून द्या. आम्ही आल्याच्या नंतर तुम्ही अर्धा तासाने येतात हे काही बरोबर नाही, असं म्हणत पुन्हा जर असं घडलं तर या डॉक्टरांना लाथा घाला, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन लावून देत सदर डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणीही केली.

कळमनुरी शहरातील आठवडी बाजारात गंगाधर चापटे यांच्या घरी शनिवारी दुपारी गॅस सिलेंडरची गळती होऊन घराला आग लागली होती. या आगीत गंगाधर चापटे त्यांची पत्नी मुलगा व मुलगी हे भाजून जखमी झाले . कळमनुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच फायरब्रीग्रेड च्या गाडी सह पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. जखमींना तात्काळ कळमनुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले.

डॉक्टर काय म्हणाले?

या सगळ्या घटनेनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ने संबंधित डॉक्टरांशी फोनवरुन संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टरांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, ही घटना दुपारी साडेबारा वाजता घडली. त्यानंतर रुग्णांना कळमनुरी रुग्णालयात 12.40 वाजता नेण्यात आले.

येथील डॉक्टरांनी त्यांना नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मी दुपारी दोन वाजता जेवणासाठी घरी गेलो होतो. नेमक्या त्याचवेळी साधारण 3.40 वाजता आमदार संतोष बांगर रुग्णालयात आले. मी रुग्णालयात आल्यानंतर माझं काहीही ऐकून न घेता ते माझ्यावर भडकले, असे डॉक्टरांनी सांगितले.

(Shivsena MLA Santosh Banger scuffle with doctor in hospital Nanded Maharashtra)

Published On - 7:33 am, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI