गोरगरीब रुग्णांसाठी स्वतंत्र रिलीफ फंड उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली : राज्यात गोरगरीब रुग्णांचा प्रश्न चिंताग्रस्त करणारा आहे. अनेकांना केवळ आर्थिक अडथळ्यांमुळे योग्य उपचार घेता येत नाही. हेच हेरुन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाने स्वतंत्र रिलीफ फंड म्हणजे मदतनिधी उभारण्याचे ठरवले आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी या रिलीफ फंडचा उपयोग होईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. …

गोरगरीब रुग्णांसाठी स्वतंत्र रिलीफ फंड उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली : राज्यात गोरगरीब रुग्णांचा प्रश्न चिंताग्रस्त करणारा आहे. अनेकांना केवळ आर्थिक अडथळ्यांमुळे योग्य उपचार घेता येत नाही. हेच हेरुन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदतकक्षाने स्वतंत्र रिलीफ फंड म्हणजे मदतनिधी उभारण्याचे ठरवले आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी या रिलीफ फंडचा उपयोग होईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. डोंबिवली येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी संयुक्तपणे लाभार्थी रुग्णांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते.

या मेळाव्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह पत्रकार राजेंद्र हुंजे, महापौर विनिता राणे, उपमहापौर रमाकांत मढवी, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगरसेवक विश्वनाथ राणे, निलेश शिंदे तसेच महाआरोग्य शिबिरातील सहभागी डॉक्टर्स तसेच लाभार्थी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच मेळाव्यात खा. डॉ. श्रीकांत शिंदे येणाऱ्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष स्वतःचा रिलीफ फंड उभा करणार आहे. याचा फायदा गरजू रुग्णांना होईल असे सांगितले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरामध्ये एकूण 28 महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमधील मदत झालेल्या लाभार्थी रुग्णांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते. यावेळी लाभार्थी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मनोगत व्यक्त करत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना झालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून निदान झालेल्या हजारो रुग्णांवर मोतीबिंदू, रेटीना, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅन्सर इत्यादी शस्त्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यात आल्या.

शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचं दणदणीत काम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या शिवसेना वैद्यकीय कक्ष सध्या आरोग्य क्षेत्रात प्रचंड चर्चेत आहे. या कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांना थेट मदत पोहोचवण्याचं काम केले जात आहे. मंगेश चिवटे हे शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शस्त्रक्रिया-उपचार होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. तसेच गरजू रुग्ण-संबंधित रुग्णालय आणि विविध ट्रस्ट यांच्यात एक दुवा म्हणून भूमिका पार पाडली जाते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *