शिवसेनेची पुन्हा जाहीर नाराजी, खासदारांकडून काँग्रेसचा पालकमंत्री बदलण्याची मागणी

हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याचा काँग्रेसचा पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली आहे. Shivsena Guardian Minister Congress

शिवसेनेची पुन्हा जाहीर नाराजी, खासदारांकडून काँग्रेसचा पालकमंत्री बदलण्याची मागणी
हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याचा काँग्रेसचा पालकमंत्री बदलावा अशी मागणी केलीय.

हिंगोली: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन भाजपला थोपवण्यासाठी महाविकासआघाडी सरकार स्थापन केलंय. पण, या तीन चाकी रथाचे एक वर्ष पूर्ण झालं न झालं की चाके रुततात की काय अशी अवस्था निर्माण झालीय. हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याचा काँग्रेसचा पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नांदेड किंवा हिंगोलीचा पालकमंत्री बदलावा, अशी मागणी केली होती. (Shivsena MP Hemant Patil demands change Guardian Minister of Congress)

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या पालिकांना निधी मिळत नसल्याच परभणीत म्हटलं होतं. त्यानंतरच या सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याच पुढं आलं होतं. यानंतर मी अस म्हटलोच नाही,माझ्या वाक्याचा माध्यमांनी अपभ्रंश केला, असं म्हणत अशोक चव्हाणांनी सारवा सारव केली होती.

सरकारची वर्षपूर्ती अनं शिवसेना खासदारांची नाराजी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होऊन एक महिना होत आलाय. हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना काम होत नसल्याचा जाहीर आरोप केला आहे. नांदेडला अशोक चव्हाण तर हिंगोली वर्षा गायकवाड पालकमंत्री आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काँग्रेसचे असल्यानं दोन्ही पालकमंत्र्यांकडून शिवसेनेची कामे होत नसल्याचा थेट आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केलाय. यामुळं महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आलीय. हिंगोली किंवा नांदेडचा पालकमंत्री बदला, अशी मागणी हेमंत पाटील यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या समोरच केली.

हेमंत पाटलांचे आरोप काँग्रेसने फेटाळले

हिंगोली काँग्रेस कमिटीने मात्र हेमंत पाटलांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वर्षा गायकवाड या सर्वांना सोबत घेऊन विकासकामं करत आहेत,अस काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी म्हटलं आहे.

बुडत्या काळात सत्ता आल्याने सगळ्यांनाच आपल्या हाताला काही तरी लागलं पाहिजे असं वाटतंय. जीसकी भैस उसकी लाठी अशा पद्धतीच राजकारण सुरू असल्याने महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून हे छोटे मोठे वाद सोडवण्याची गरज निर्माण झालीय.

संबंधित बातम्या:

निवडणुका घ्या, पोषक वातावरण, गुप्तचर अहवालाने ठाकरे सरकारला मोठा दिलासा

शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?, सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल

(Shivsena MP Hemant Patil demands change Guardian Minister of Congress)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI