“अस्मानी आणि सुलतानी संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत, तौत्केच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच”

संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत आणि या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभा राहणारा महाराष्ट्र जगाला नवीन नाही. (Shivsena Saamana Editorial On Cyclone Tauktae)

अस्मानी आणि सुलतानी संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत, तौत्केच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच
Cyclone Tauktae
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 8:11 AM

मुंबई : कोरोना आणि चक्रीवादळाच्या लाटांचे तडाखे एका वर्षात महाराष्ट्राला दोनदा बसले. सुलतानी काय किंवा अस्मानी काय, संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत आणि या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभा राहणारा महाराष्ट्र जगाला नवीन नाही. महाराष्ट्राने अनेक ‘वादळ’वाटा तुडविल्या आहेत. ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच, अशा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून तौत्के’ चक्रीवादळाबाबत भाष्य करण्यात आले आहे. (Shivsena Saamana Editorial On Cyclone Tauktae effect on Maharashtra)

‘सामना’च्या अग्रलेखात नेमकं काय? 

कोरोना आणि चक्रीवादळाच्या लाटांचे तडाखे एका वर्षात महाराष्ट्राला दोनदा बसले. ‘तौत्के’ हे मागील तीन वर्षांत अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि महाराष्ट्र–गुजरातला धडकणारे तिसरे चक्रीवादळ आहे. 2019 मध्ये ‘वायू’ वादळाने आणि गेल्यावर्षी ‘निसर्ग’ वादळाने महाराष्ट्राला तडाखा दिला होता. आता ‘तौत्के’ने धडक दिली. सुलतानी काय किंवा अस्मानी काय, संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत आणि या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभा राहणारा महाराष्ट्र जगाला नवीन नाही. महाराष्ट्राने अनेक ‘वादळ’वाटा तुडविल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या–दुसऱ्या लाटेला महाराष्ट्राने थोपविले. ‘निसर्ग’वर मात केली. आता ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच, असे शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

यंत्रणा अलर्ट, खूप मोठे नुकसान नाही

गेल्या वर्षी जून महिन्यात देशासह महाराष्ट्र कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेशी झुंज देत असताना ‘निसर्ग’ हे शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्रावर आदळले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज सुरू असताना ‘तौत्के’ या चक्रीवादळाने महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. हे वादळ केरळ किनारपट्टीला झोडपून काढत गोवा, कोकण किनारपट्टीवर धडकले. रविवारी ‘तौत्के’ने अतिरौद्र रूप धारण केल्याने कोकण, गोवा, प. महाराष्ट्राच्या काही भागाला जोरदार तडाखा दिला. सोमवारी हेच चित्र रायगड, ठाणे, पालघर जिल्हय़ांसह मुंबई परिसरात दिसून आले. गेल्यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने ऐनवेळी दिशा बदलल्याने त्याच्या तडाख्यातून मुंबई सुदैवाने बचावली होती. आताही ‘तौत्के’ चक्रीवादळ मुंबईवर थेट धडकणार नव्हते, तरी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाने मुंबईला तडाखा दिलाच.

लॉक डाऊन असल्यामुळे अशीही सध्या मुंबईची ‘रफ्तार’ मंदावलेलीच आहे. ‘तौत्के’मुळे सोमवारी ती आणखी थंडावली इतकेच. मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. सोसाटय़ाचे वारे आणि पाऊस यामुळे झालेली काही ठिकाणची पडझड, झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, लोकल वाहतूक-रस्ते वाहतुकीवर परिणाम होणे असे प्रकार झालेच. अर्थात महापालिका आणि अन्य यंत्रणा अलर्ट असल्याने खूप मोठे नुकसान झाले नाही, हे चांगलेच झाले, असेही यात म्हटले आहे.

किमान 48 तास राज्याच्या मोठय़ा भागावर परिणाम 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ांना मात्र या चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला. तेथे मोठय़ा प्रमाणावर झाडे कोसळली, घरांची पडझड झाली. रत्नागिरीमध्ये तीन हजार 800 तर रायगडमध्ये सुमारे 6 हजार नागरिकांचे आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. ‘तौत्के’ हे ‘अतिरौद्र’ श्रेणीत मोडणारे चक्रीवादळ असल्याने शेती, पिके, फळे, झाडे, स्थावर मालमत्ता, घरांची पडझड, वीजपुरवठा खंडित होऊन तो सुरळीत होण्यास विलंब लागणे या गोष्टी अपरिहार्यच आहेत. राज्य शासनासह जिल्हा-स्थानिक प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा सर्वांनीच योग्य खबरदारी घेतली. तरीही ‘तौत्के’मुळे देवगडमध्ये खडकावर आदळून बोटी वाहून गेल्या. त्यात एका खलाशाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे बेपत्ता आहेत.

रायगडमध्ये घरावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. खान्देशातही अशाच दुर्घटनेत दोन बहिणी मरण पावल्या. नवी मुंबईत एका तरुणाचा मृत्यू झाला. कोकणात गेल्यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने हाहाकार उडविला होता. आता ‘तौत्के’ चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळ मंगळवारी गुजरातच्या दिशेने सरकलेले असेल, पण त्याचा परिणाम पुढील किमान 48 तास राज्याच्या मोठय़ा भागावर होणार आहे. वादळी वाऱ्यांसह अनेक जिल्हय़ांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.

राज्य सरकारची सर्व प्रकारे पूर्वतयारी

आधीच कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे अपरिहार्य ठरलेले लॉक डाऊन यामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शेतमालही त्यातून सुटलेला नाही. त्यात ‘तौत्के’ चक्रीवादळाने महाराष्ट्राला तडाखा दिला. राज्य सरकारने सर्व प्रकारची पूर्वतयारी, खबरदारी, सज्जता यात कोणतीही कसूर ठेवली नाही, पण ‘तौत्के’ हे चक्रीवादळ अतिरौद्र असल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आणि निसर्ग चक्रीवादळ. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आणि ‘तौत्के’ चक्रीवादळ, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.  (Shivsena Saamana Editorial On Cyclone Tauktae effect on Maharashtra)

संबंधित बातम्या : 

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

Cyclone in Mumbai: मुंबईत डेंजर वारा, पावसाचा मारा, विमान-लोकल सेवा ठप्प, राज्यात 6 जण दगावले; धोका अजून कायम!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.