फडणवीसांच्या हस्ते नाशिकच्या पुलाचं ई-भूमिपजून निश्चित, शिवसेनेचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा

नाशिक शहरातील मायको सर्कलवरुन सुरुवात होणाऱ्या या पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे (Shivsena Devendra Fadnavis Nashik flyover)

फडणवीसांच्या हस्ते नाशिकच्या पुलाचं ई-भूमिपजून निश्चित, शिवसेनेचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा
देवेंद्र फडणवीस

नाशिक : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरुन भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. इतकंच काय तर सत्ताधारी भाजपने या पुलाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला, तर हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. (Shivsena warns over BJP Devendra Fadnavis led Nashik flyover stone foundation)

नाशिक शहरातील मायको सर्कलवरुन सुरुवात होणाऱ्या या पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. पुलाला माझ्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाल्याचा दावा शिवसेना महानगरप्रमुख आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. तर आम्ही निधी दिल्याने हे काम पूर्ण होणार असल्याचं सत्ताधारी भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पुलावरुन नाशिकमध्ये भाजप-सेनेत संघर्ष वाढला आहे.

फडणवीसांच्या हस्ते होणारं भूमिपूजन टळलं होतं

मायको सर्कल ते त्र्यंबकेश्वर रोड, सिडकोकडे जाणाऱ्या या Y अँगलच्या पुलाला साधारण 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आधी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा होणार होता, मात्र कोरोनामुळे फडणवीसांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर आता हाच सोहळा ऑनलाईन घेण्याची भाजपची तयारी पूर्ण झाली आहे.

भूमिपूजन सोहळा उधळण्याचा इशारा

या पुलाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आल्यानंतर सेनेने आक्रमक होत हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या इशारा दिला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरुन आता सेना-भाजपात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा – राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढील नाशिक महापौर शिवसेनेचा होईल, अशी राजकीय भविष्यवाणी केल्यानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच दंगल सुरु झालीय. राऊत कुठल्या जोरावर ही गोष्ट बोलताहेत हीच कल्पना विरोधकांना येत नाहीये. त्यामुळेच राऊतांच्या दाव्याविषयी तर्कवितर्क लावण्यास उधाण आलंय. (Shivsena warns over BJP Devendra Fadnavis led Nashik flyover stone foundation)

नाशिक मनपामध्ये पक्षीय बलाबल

भाजप – 65
शिवसेना – 35
राष्ट्रवादी – 6
काँग्रेस – 6
मनसे – 6
रिपाई – 1

संबंधित बातम्या :

नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम, भाजपकडून उद्घाटनांचा धडाका, शिवसेनेचा आक्षेप

(Shivsena warns over BJP Devendra Fadnavis led Nashik flyover stone foundation)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI