
सातारा फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडेंनी आत्महत्या केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. पीएसआय गोपाळ बदने याच्यासह पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांना पोलिसांनी अटक केली. 28 ऑक्टोबरपर्यंत प्रशांत बनकर याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर रात्री उशिरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने स्वत: पोलिसांसमोर शरणागती घेतली. रात्री एक तास त्याची कसून चाैकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे मेडिकल करण्यात आले. आज पोलिस आरोपीला कोर्टात दाखल करतील. संपदा मुंडे यांनी पीएसआय गोपाळ बदने याला आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे तळहातावरील नोटमध्ये म्हटले. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.
पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याच्या बहीण भावांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल धक्कादायक दावे केली असून महिला डॉक्टर गेल्या वर्षभरापासून आमच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. ती महिला डॉक्टर माझ्या भावाला सतत फोन करून त्रास देत असे. प्रशांत बनकरच्या बहिणीने म्हटले की, काही दिवसांपूर्वी तिने माझ्या भावाला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र, माझ्या भावाने लग्नासाठी तिला नकार दिला. दिवाळीच्या वेळी ती थोडी तणावात होती.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात बोलताना म्हटले की, डॉक्टरच्या मृत्यूनंतर सापडलेल्या चिठ्ठीवर दोन नावे लिहिलेली होती. परंतु आता तांत्रिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर हे स्पष्ट होत आहे की, हे प्रकरण एकतर्फी भावनिक संबंधाचे देखील असू शकते. व्हाट्सअॅप मेसेज आणि कॉलवरून तांत्रिक तपास केला जातोय. या प्रकरणासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशीही मागणी केली जात आहे.
संपदा मुंडे हिच्यावरच पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केली आहेत. प्रशांत बनकर याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातूनच अटक केली. पीएसआय गोपाळ बदने हा फरार होता. आता तो देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, एका महिला डॉक्टराने अशाप्रकारची नोट हातावर लिहून आत्महत्येसारखे पाऊस उचलल्याने खळबळ उडाली असून संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केली आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागलंय.