धक्कादायक! कॉलेजच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, थोडक्यात बचावला

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

धक्कादायक! कॉलेजच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, थोडक्यात बचावला

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजच्या वाढत्या त्रासामुळे विद्यार्थ्यांनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Shocking student tries to commit suicide after getting fed up with college troubles in Aurangabad )

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल विजय लव्हारे असं विष प्राशन केलेल्या युवकाचं नाव आहे. तो कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असून कॉलेजच्या जाचामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आल्याचं सांगण्यात येत आहे. साहिल याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी सुसाईड नोट लिहली असून अनेक वेळा मानसिक त्रास दिल्याचं त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. गंभीर म्हणजे नर्सिंग कॉलेजच्या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप साहिलच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाणीवपूर्वक गुण कमी दिले जात असल्याचंही सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. या सगळ्यामुळे साहिलवर नैराश्य ओढावलं होतं. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कॉलेजच्या त्रासामुळे विद्यार्थी आंदोलनाला बसले असून कॉलेजला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या साहिलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Shocking student tries to commit suicide after getting fed up with college troubles in Aurangabad )

संबंधित बातम्या – 

अमित शाहांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं; राणेंची प्रार्थना

चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय : राज ठाकरे

Ajit Pawar | अजितदादा व्यासपीठावर, कार्यकर्त्याची घोषणाबाजी, दादा का म्हणाले, तुझी ग्रामपंचायत आली का?

(Shocking student tries to commit suicide after getting fed up with college troubles in Aurangabad )

Published On - 3:07 pm, Sat, 6 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI