वसई-विरारमधील दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत 2 तासांची वाढ, पालिका आयुक्तांचे आदेश

वसई-विरार महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांसाठी आज आनंदाजी बातमी (Vasai-Virar Shop opening time increase) आहे.

वसई-विरारमधील दुकानं सुरु ठेवण्याच्या वेळेत 2 तासांची वाढ, पालिका आयुक्तांचे आदेश

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांसाठी आज आनंदाजी बातमी (Vasai-Virar Shop opening time increase) आहे. आजपासून वसई-विरार पालिका क्षेत्रात दुकानं आणि मार्केट खुली ठेवण्यात दोन तासाची अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे (Vasai-Virar Shop opening time increase).

यापूर्वी दुकानं आणि मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेशे दिले होते. परंतु आता दोन तासाचा कालावधी हा वाढविण्यात आलेला असून व्यापारी आपली दुकानं सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवू शकतात.

मिशन बिगीन अगेन टप्पा पाच अंतर्गत 7 जुलै 2020 रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार सदरील वेळेमध्ये दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. वसई विरार शहर महानगर पालिकेतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील दुकाने आणि मार्केट p1 p2 पद्धतीनेच चालू राहणार आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

दुकानात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे आहे. दुकानदार किंवा मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासोबत दुकानही बंद करणार, असे आदेश वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

Corona Virus | हवेतून कोरोनाचा संसर्ग शक्य, WHO नव्या गाईडलाईन्स जारी करण्याची शक्यता

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 4634 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, तर 6603 नव्या रुग्णांची भर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *