चेंगराचेंगरीनंतर आता औरंगाबादेत कोरोना लसीचा मोठा तुटवडा, 69 लसीकरण केंद्र बंद

चेंगराचेंगरीनंतर आता औरंगाबादेत कोरोना लसीचा मोठा तुटवडा, 69 लसीकरण केंद्र बंद
लसीच्या तुटवड्यामुळे औरंगाबादेतील अनेक लसीकरण केंद्र बंद

कोरोना लसीअभावी औरंगाबाद शहरातील 69 लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. शहराला 6 हजार लस प्राप्त झाल्या आहे. मात्र, काही तासांमध्येच या लसी संपल्यामुळे आता नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन रिकाम्या हाती परताव लागत आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: सागर जोशी

Jul 12, 2021 | 9:06 AM

औरंगाबाद : कोरोना लस घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील लसीकरण केंद्रावर झालेली चेंगचेंगरीची घटना ताजी आहे. असं असताना आता पुन्हा एकदा औरंगाबाद शहरात लसीचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. कोरोना लसीअभावी औरंगाबाद शहरातील 69 लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. शहराला 6 हजार लस प्राप्त झाल्या आहे. मात्र, काही तासांमध्येच या लसी संपल्यामुळे आता नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन रिकाम्या हाती परताव लागत आहे. (Shortage of vaccines at vaccination centers in Aurangabad, 69 vaccination centers closed)

कोरोना लसींचा साठा संपल्यामुळे तब्बल 69 केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आलीय. औरंगाबादेत सध्या फक्त 3 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. तर अन्य लसीकरण केंद्र ओस पडली आहेत. कोरोना लस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रांवर येत आहेत. पण त्यांना रिकाम्या हाती परतावं लागत आहे.

18 खासगी कोविड सेंटर बंद

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे औरंगाबाद शहरातील 18 खासगी कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. औरंगाबाद महापालिकेने यापूर्वी 21 तर खासगी रुग्णालयांनी 18 कोविड रुग्णालये बंद केली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे आता खासगी रुग्णालयांकडून कोविड सेंटर बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला अर्ज केले जात आहेत. तर संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता 55 कोविड रुग्णालये सुरुच ठेवण्यात आली आहेत.

औरंगाबादचे विद्यार्थी म्हणणार ‘स्कूल चले हम…’

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त असलेल्या 901 गावांमधील 1368 शाळा सुरू करण्याची चाचपणी सुरु आहे. शासनाच्या चौकटीत बसणाऱ्या शाळा पंधरा तारखेपासून सुरू करु, असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी सांगितले. गेल्या अनेक महिने कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परंतु शाळा जरी बंद असल्याने विद्यार्थ्य्यांचा ऑनलाईन क्लास सुरु होता. मात्र यामध्ये अनेक अडचणी उभ्या राहत होत्या. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांकडे मोबईल नव्हते, मोबईल आले तर नेटवर्क मिळत नव्हतं… अशा एक ना अनेक अडचणींना शिक्षणामध्ये दरम्यानच्या काळात अडचणी आल्या. आता कोरोनाची परिस्थिती हळहळू सावरायला सुरुवात झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त असलेल्या 901 गावांमधील 1368 शाळा सुरू करण्याची चाचपणी सुरु असल्याची माहिती जि.प. चे सीईओ डॉ मंगेश गोंदावले यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Video : औरंगाबादच्या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी, सकाळी 7 पासून नागरिकांच्या रांगा

लसीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चप्पल रांगेत, औरंगाबादकरांची शक्कल, स्वत: सावलीत घोळका

Shortage of vaccines at vaccination centers in Aurangabad, 69 vaccination centers closed

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें